शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur-कोल्हापुरात कोरोना चाचणीसाठी आठवड्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 15:41 IST

कोरोना विषाणूची चाचणी करता येणारे सीबी नॅट हे नवीन यंत्र कोल्हापुरात दाखल झाले. पण इतर तांत्रिक सुविधा पूर्ततेनंतर आठवड्यात ‘कोरोनां’बाबत रुग्णांच्या घशातील स्रावच्या चाचण्या करता येणार आहेत.

ठळक मुद्देकोल्हापुरात कोरोना चाचणीसाठी आठवड्याची प्रतीक्षासीबी नॅट यंत्र आले : चाचणी सुरू करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न

कोल्हापूर : कोरोना विषाणूची चाचणी करता येणारे सीबी नॅट हे नवीन यंत्र कोल्हापुरात दाखल झाले. पण इतर तांत्रिक सुविधा पूर्ततेनंतर आठवड्यात ‘कोरोनां’बाबत रुग्णांच्या घशातील स्रावच्या चाचण्या करता येणार आहेत.सद्य:स्थितीत पुण्यातील राष्ट्रीय विषाणू परीक्षण संस्था आणि मिरज येथून चाचण्या करण्यात येत आहेत.कोरोनाची व्याप्ती वाढू लागल्याने रुग्णांचीही संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सीपीआर हे कोल्हापूरच्या आरोग्य विभागाचे मुख्य केंद्र मानले जाते. या कोरोनाच्या चाचणीसाठी आवश्यक असणारे सीबी नॅट हे नवीन स्वयंचलित यंत्र हे शनिवारी रात्री कोल्हापुरात दाखल झाले. सुमारे ८० लाख रुपये अशी या यंत्राची किंमत आहे. सीपीआरमधील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हे यंत्र बसविण्यात येणार आहे.हे अद्ययावत यंत्र आले असले तरीही अद्याप चाचणीचे कार्टेज, पायाभूत सुविधा उपलब्ध करणे तसेच लॅब सुरू करण्यासाठी आयसीएमआरची मान्यता मिळविणे यासाठी प्रशासनाचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतरच हे यंत्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे हे नवीन यंत्र सुरू करण्यासाठी किमान आठवड्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यानंतच ‘कोरोना’बाधित रुग्णाच्या घशातील स्रावाची तपासणी करता येणार आहे.किमान हजार चाचण्याकेंद्र सरकारकडून हे यंत्र देण्यात आले आहे. सद्य:स्थितीत पुणे आणि मिरजकडून चाचण्यांचे अहवाल मिळत आहेत. पण राज्यभर कोरोनाचे वाढते रुग्ण आणि त्या राष्ट्रीय विषाणू चाचणीची वाढती संख्या पहाता पुणे आणि मिरज येथे प्रयोगशाळेत रुग्णांच्या घशातील स्राव चाचणीसाठी पाठवावे लागत आहेत. पण तेथेही चाचणीचा भार वाढल्याने रुग्णांच्या स्राव चाचणीची प्रतीक्षा करावी लागत आहे. सीपीआर रुग्णालय आवारात ही सोय झाल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर