शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur-जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची प्रकृती ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 15:52 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले दोघे भाऊ-बहीण कोरोनामुक्त झाले. पेठवडगाव येथील मिरज रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधीत २२ वर्षीय तरुणीच्या पुढील दोन्हीही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत तर कसबा बावडा येथील कोरोनाबाधित वृद्धेच्या घशातील स्रावाची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यांचीही कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे समाधानकारक चित्र आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील कोरोनाबाधितांची प्रकृती ठणठणीतदोन अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ‘सीपीआर’च्या आरोग्य प्रशासनावर पुन्हा ताण

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले दोघे भाऊ-बहीण कोरोनामुक्त झाले. पेठवडगाव येथील मिरज रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधीत २२ वर्षीय तरुणीच्या पुढील दोन्हीही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत तर कसबा बावडा येथील कोरोनाबाधित वृद्धेच्या घशातील स्रावाची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यांचीही कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे समाधानकारक चित्र आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले कोरोनाबाधित झालेल्या मंगळवार पेठेतील भक्तिपूजा नगरातील भाऊ-बहीण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना ेशनिवारी अथायू हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला तर पेठवडगाव येथील मिरज रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित तरुणीच्याही पुढील दोन्हीही चाचण्या यापूर्वी निगेटिव्ह आल्या आहेत.

त्यामुळे त्यांना मिरज येथेच प्रशासकीय इमारतीत स्वतंत्रपणे ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याने येत्या दोन दिवसांत त्यांनाही डिस्चार्ज देण्यात येण्याची शक्यता आहे.याशिवाय कसबा बावडा येथील बाधित वृद्धेचीही प्रकृती उत्तम आहे. त्यांचे १४ दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण झाले आहे. त्यांच्या घशातील पहिला स्राव तपासणीसाठी घेण्यात येणार आहे. तो निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा पुढील दोन-तीन दिवसांत आणखी एक स्राव घेऊन तो निगेटिव्ह आल्यास त्यांनाही कोरोनामुक्त घोषित करून त्यांनाही लवकरच डिस्चार्ज देण्याची शक्यता आहे.

सद्य:स्थितीत त्यांची प्रकृती उत्तम आहे. शाहूवाडीतील दिल्लीतील मरकजहून आलेला तरुण, त्याची आई आणि चुलतभाऊ या तिघाही कोरोनाबाधितांवर ‘सीपीआर’च्या कोरोना कक्षात उपचार सुरू आहेत. त्या सर्वांची प्रकृती सध्या ठीक आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.मुंबईहून कर्नाटकात निघालेल्या मजुरांना अडवून कोल्हापुरात सीपीआरमध्ये त्यांची तपासणी केली. त्यातील दोन अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तो कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने ‘सीपीआर’च्या आरोग्य प्रशासनावर पुन्हा ताण आला आहे. जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असताना परजिल्ह्यांतून आलेला व पर राज्यांत जाणारा हा प्रवासी कोरोनाबाधित झाल्याने यंत्रणा खडबडली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर