शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur -जयसिंगपुरातील कलावती मंदिर,संभाजीनगर, नांदणी रोड परिसर सीलबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 12:07 IST

जयसिंगपूरमधील कलावती मंदीरशेजारी, संभाजीनगर, नांदणी रोड या भागात कोरोना संसर्गित रूग्ण सापडल्याने त्याच्या राहत्या निवासस्थानापासून 300 मीटर अंतरापर्यंतच्या चारही बाजूस रस्त्यांच्या सीमा सीलबंद करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे आदेश इचलकरंजीचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ. विकास खरात यांनी काल दिले.

ठळक मुद्देजयसिंगपुरातील कलावती मंदिर,संभाजीनगर, नांदणी रोड परिसर सीलबंदउपविभागीय दंडाधिकारी डॉ. विकास खरात यांचे आदेश

कोल्हापूर : जयसिंगपूरमधील कलावती मंदीरशेजारी, संभाजीनगर, नांदणी रोड या भागात कोरोना संसर्गित रूग्ण सापडल्याने त्याच्या राहत्या निवासस्थानापासून 300 मीटर अंतरापर्यंतच्या चारही बाजूस रस्त्यांच्या सीमा सीलबंद करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे आदेश इचलकरंजीचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ. विकास खरात यांनी काल दिले.या आदेशात म्हटले आहे, सद्यस्थितीत कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोराना विषाणूचे संसर्ग रोखण्याकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपाय-योजना आखणे आवश्यक आहे.

कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता या विषाणूची लागण एक संक्रमित रूग्णाकडून अन्य व्यक्तीस, इसमास त्यांच्या संपर्कात आल्याने होते. तसेच शिरोळ तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 1 झाली आहे.

हा रुग्ण कलावती मंदिर शेजारी, संभाजीनगर, नांदणी रोड या भागातील आहे. या ठिकाणी त्यांच्या राहता निवासस्थानापासून 300 मीटर अंतरापर्यंतच्या चारही बाजू सीमा सिलबंद करणे आवश्यक आहे.भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम - 1897 व जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडील दिशा निर्देशानुसार जयसिंगपूर येथील कलावती मंदिर शेजारी संभाजीनगर नांदणी रोड या भागातील क्षेत्र उपविभागीय दंडाधिकारी इचलकरंजी विभाग इचलकरंजी या आदेशाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात येत आहे.

या क्षेत्राच्या चारही बाजूस सर्व रस्त्यांच्या सीमा सिलबंद करण्यात येत आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये जयसिंगपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी खालीलप्रमाणे काटेकोरपणे पूर्तता करावी.या प्रतिबंधित क्षेत्रामधील सर्व 100 टक्के रहिवाशांचे मोबाईल आरोग्य सेतू ॲप कार्यान्वित करून घेण्यात यावे. बाधित रूग्णांच्या संपर्कातील सर्व रहिवाश्यांची यादी सविस्तरपणे तयार करावी. बाधित रूग्णांच्या संपर्कातील रहिवाशांचे होम आणि संस्थात्मक क्वॉरंटाईन बाबत वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती त्वरित निर्णय घेवून कार्यवाही करावी.

या प्रतिबंधित क्षेत्रामधील संपूर्ण घरांचे विशेष पथकामार्फत सर्वेक्षण करून घेण्यात यावे. बाधित रूग्णांचे संपर्कातील रहिवाशांच्या वैद्यकीय अधिकारी यांच्या तपासणी अंती विहीत केलेल्या निर्देशानुसार व्यवस्थापन करण्यात यावे. प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाश्यांचे संपर्क माध्यमाव्दारे परिणामकारक समुपदेशन व प्रशिक्षण देण्यासाठी प्रबळ उपाययोजनांचा अवलंब करण्यात यावा.

प्रतिबंधित क्षेत्रामध्ये प्रवेशास व बाहेर जाण्यास पूर्णत: प्रतिबंध करण्यात यावा. तथापि, आवश्यक सेवेसाठी आत-बाहेर येणाऱ्या रहिवाशांसाठी नगरपालिकामार्फत स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात येवून नोंद वहित तपशिलवार नोंदी ठेवण्यात याव्यात. पोलीस प्रशासन तसेच जयसिंगपूर नगरपरिषद यांनी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये बॅरेकेटिंग केलेल्या क्षेत्रामध्ये कडक बंदोबस्त व नियंत्रण ठेवण्यात यावे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर