शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने हिरावला ५ हजार ५३५ विद्यार्थिनींचा उपस्थिती भत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : यंदा जिल्ह्यातील ५ हजार ५३५ विद्यार्थिनींचा वार्षिक उपस्थिती भत्ता कोरोनाने हिरावून घेतला आहे. त्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : यंदा जिल्ह्यातील ५ हजार ५३५ विद्यार्थिनींचा वार्षिक उपस्थिती भत्ता कोरोनाने हिरावून घेतला आहे. त्यात अनुसूचित जाती, भटक्या जाती व विमुक्त जमातीतील दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थिनींचा समावेश आहे. या विद्यार्थीनी ऑनलाईन उपस्थित आहेत. मात्र, कोरोनामुळे प्रत्यक्ष वर्गात उपस्थित नसल्यामुळे त्यांचा वार्षिक भत्ता शासनाकडून स्थगित करण्यात आल्याने त्यांना फटका बसला आहे.

प्राथमिक शाळांमध्ये मुलींची उपस्थिती वाढावी, या उद्देशाने राज्य शासनाने वार्षिक उपस्थिती भत्ता योजना सुरू केली. त्यामध्ये शालेय कामकाजाच्या दिवसांपैकी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त दिवस शाळेत उपस्थित असणाऱ्या इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलींना एक रुपया प्रतिदिवस, असा एका शैक्षणिक वर्षामध्ये २२० रुपये इतका उपस्थिती भत्ता दिला जातो. जिल्ह्यात गेल्यावर्षी अनुसूचित जाती, भटक्या जाती व विमुक्त जमातीतील दारिद्र्य रेषेखालील एकूण ४७३७ विद्यार्थिनींसाठी एकत्रितपणे १३ लाख रुपये इतका भत्ता मंजूर झाला. त्यापैकी १० लाख ४२ हजार १४० रुपये वितरित केले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील ५५३५ विद्यार्थिनींसाठी १२ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, कोरोनामुळे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा भरलेल्या नाहीत. त्यामुळे उपस्थिती भत्ता देऊ नये, असे आदेश शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे या विद्यार्थिनींना भत्ता मिळणार नाही. पण, ऑनलाईन वर्गांना उपस्थित असूनही भत्ता मिळणार नसल्याने विद्यार्थिनी, पालकांमध्ये नाराजी आहे.

चौकट

दिवसाला एक रुपया भत्ता

शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी दिवसाला एक रुपया भत्ता दिला जायचा. आता तोही बंद झाल्याने या विद्यार्थिनींना मोठा फटका बसणार आहे. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून भत्ता मिळाला नसल्याचे काही विद्यार्थिनींनी सांगितले.

प्रतिक्रिया

कोरोनाच्या कारणावरून या विद्यार्थिनींचा उपस्थिती भत्ता बंद करणे अन्यायकारक आहे. वर्ग भरत नसले, तरी ऑनलाईन शिक्षण सुरू असून त्यासाठी मोबाईल, रिचार्जचा खर्च होतच आहे. त्यामुळे या विद्यार्थिनींना भत्ता द्यावा.

- प्रा. सुनील भोसले, प्रदेश सरचिटणीस (व्हीजेएनटी सेल), राष्ट्रवादी काँग्रेस.

यावर्षीच्या ५५३५ विद्यार्थिनींसाठीच्या उपस्थिती भत्ता योजनेतील रक्कम मंजूर झाली आहे. मात्र, हा उपस्थिती भत्ता स्थगित केल्याचे पत्र शिक्षण संचालकांकडून दि. २२ फेब्रुवारी रोजी मिळाले आहे.

- आशा उबाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी.

काय म्हणतात विद्यार्थिनी?

मी सर्वसामान्य कुटुंबातील आहे. या भत्त्यामुळे माझ्या शिक्षणाच्या खर्चाला हातभार लागतो. त्यामुळे भत्ता रद्द करू नये.

- पूनम जावीर, इयत्ता तिसरी, कागल.

गेल्या दोन वर्षांपासून हा भत्ता मिळालेला नाही. थकीत असलेला आणि यावर्षीचा देखील भत्ता मिळावा.

- अनुष्का घाटगे, इयत्ता चौथी, कणेरीवाडी.

आकडेवारी दृष्टिक्षेपात...

गेल्यावर्षी भत्ता दिलेल्या विद्यार्थिनी : ४७३७

एकूण वितरित केलेली रक्कम : १०४२१४०