शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

कोरोना संकटात उजळाईवाडीच्या महिला बनल्या आत्मनिर्भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:30 IST

मोहन सातपुते उचगाव : कोरोना संकटात अनेकांचे रोजगार हिरावले, व्यवसाय बंद पडले. मात्र, अशा अडचणीच्या काळातही त्या घट्ट ...

मोहन सातपुते

उचगाव : कोरोना संकटात अनेकांचे रोजगार हिरावले, व्यवसाय बंद पडले. मात्र, अशा अडचणीच्या काळातही त्या घट्ट पाय रोवून उभ्या आहेत...संसाराचा गाडाही हाकतात अन् अनेकांना आत्मनिर्भरतेची वाटही दाखवतात...कारण, १५ वर्षांपूर्वी एकीचे बळ दाखवत त्यांनी रोवलेली आत्मनिर्भरतेची मुहूर्तमेढच त्यांना या संकटाच्या काळात धावून आली आहे. विविध उत्पादनांची निर्मिती करून त्यांची विक्री करत शेकडो हात आत्मनिर्भरतेचा गजर करत आहेत. उजळाईवाडी (ता.करवीर) येथील यशस्विनी महिला मंडळाच्या शेकडो महिलांनी निर्माण केलेली ही यशोगाथा अनेकासांठी प्रेरक ठरत आहे. एखादे संकट आपल्यासाठी नेहमीच संधी घेऊन येते, असे म्हणतात. याच संकटाचे संधीत रूपांतर करण्याची किमया उजळाईवाडीतील १३ महिला बचत गटांतील महिलांनी साधली आहे. या विविध तेरा बचत गटांतील महिलांना येथील यशस्विनी महिला मंडळाने एकाच धाग्यात गुंफत त्यांना आत्मनिर्भरतेची वाट दाखवल्याने या महिला कोरोनाच्या संकटातही एकीचे बळ घेत आपल्या संसाराचा गाडा मोठ्या नेटाने हाकत आहेत. उजळाईवाडी (ता.करवीर) येथील यशस्विनी महिला मंडळाच्या माध्यमातून २००६ मध्ये स्वयंसाहाय्यता समूह गटाची स्थापना करण्यात आली. एकमेकींच्या अडचणी समजून घेतानाच या महिलांनी स्वत:साठीही आपली एक वेगळी वाट शोधली. यातून या महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी विविध प्रशिक्षणे दिली गेली. त्यामुळे याच प्रशिक्षणाचा या महिलांनी लॉकडाऊन काळात लाभ उठविला. लॉकडाऊन काळात उभा देश कुलूपबंद असताना या महिलांनी मात्र, लोणची, मसाले, चटणी, पिठाचे पापड बनवत त्यांची विक्री केली. यातून या महिलांना आर्थिक लाभ तर झालाच, शिवाय घरबसल्या रोजगारही मिळाला. काही जणींनी घरच्या घरी खानावळ सुरू करून अर्थार्जनाचा मार्ग स्वीकारला. अनेक महिलांनी आपण कोणत्याच कामात कमीपणा मानायला नको ही मानसिकता ठेवत इस्त्री काम, भाजीपाला, किराणा दुकान, पिठाची गिरणीही चालविली. यातून या महिला आत्मनिर्भर बनत गेल्या. विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात मास्कला सर्वाधिक मागणी होती. ही गरज ओळखून या महिलांनी मास्कची निर्मिती करत त्याचीही मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे. हे मास्क सरकारी कार्यालये, खाजगी संस्था, मेडिकल्स आणि ग्रामपंचायतींकडे वितरित करत आहेत. यापूर्वी या महिलांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, नेत्रदान शिबिर, वृक्षारोपण, १६ वर्षे स्मशान भूमीला शेणी व तिरडीदान, एकत्र कुटुंब पद्धतीसाठी संवाद, स्वछता अभियान यासारखे उपक्रम राबविले आहेत.

या बचत गटातील शालन पोवार, शुभांगी पोवार, सारिका कासारकर, अनुसया भोसले, वृषाली चव्हाण, स्मिता हचनाळे, सुरेखा साळोखे, संगीता बारड, स्मिता गोंजाले ,माधुरी परीट, योगिता इंगळे, यशवंता गरड, प्रीती तावडे, सुजाता पाटील, प्रिया चौगुले, संजीवनी माने, पुष्पा बोंद्रे, वैशाली नलवडे, इंदूबाई दळवी, सविता चोगुले, मंगल शिंदे, सुनीता गाडेकर, मंगल पाटील, संध्या भोसले, प्रिया घेवडे अश्या कित्येक महिला आत्मनिर्भर होऊन घराला घरपण देत प्रशिक्षणाच्या माध्यमातून पुढे होत आज स्वयंरोजगार मिळवत आहेत.

कोट : २००६ साली उजळाईवाडी येथे आम्ही एकत्र आलो. सुरुवातीला बचत गट स्थापन केले. त्यातून स्वयंसाहाय्यता निर्माण होत गेली. बचत गट एकमेकींच्या साहाय्याने पुढे सरकत गेला. घरचे आर्थिक प्रश्न सोडवणूक करत बचत गटाची कर्जेही फेडत धाडसाने पुढे आल्या. आज त्या आत्मनिर्भर बनून इतर महिलांना सहभागी करत आधार देऊ लागल्या. लॉकडाऊन झाले तरी त्या खंबीरपणे उभ्या आहेत.

शैलजा भोसले, मराठा महासंघ, महिला जिल्हाध्यक्षा