शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

corona in belgaon -पुन्हा बेळगावला दणका...तब्बल ११ कोरोना बाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 13:19 IST

बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी सकाळच्या मेडिकल बुलेटिनने खळबळ माजवली. जिल्ह्यात एका दिवसात ११ रुग्णांची वाढ झाली आहे.

ठळक मुद्देपुन्हा बेळगावला दणका...तब्बल ११ कोरोनाबाधित रुग्ण कोरोना बाधितांचे एकूण संख्या ८५

बेळगाव : जिल्ह्यात शुक्रवारी सकाळच्या मेडिकल बुलेटिनने खळबळ माजवली. जिल्ह्यात एका दिवसात ११ रुग्णांची वाढ झाली आहे.

गेल्या कांही दिवसात जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण सापडला नसल्याने समाधान व्यक्त होत असतानाच गुरुवारी हिरेबागेवाडी येथील एका मुलीला करण्याची बाधा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर आज शुक्रवारी जिल्ह्यात तब्बल ११ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे एकूण संख्या ८५ झाली आहे.

नव्याने आढळून आलेले कोरोनाग्रस्त रुग्ण हिरेबागेवाडी येथील १० तर रायबाग कुडची १ असून हॉट स्पॉट असणाऱ्या याठिकाणी कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य खाते कसोशीने प्रयत्न करत आहे.लॉक डाऊन शिथिल झाल्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत होती. अलीकडे तीन दिवसात २१ जण मुक्त झाले होते त्यामुळे लवकरच जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र काल गुरुवारी हिरे बागेवाडी येथील १३ वर्षीय मुलीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आले.

दरम्यान, काल गुरुवारी सायंकाळी प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या २४९ स्वॅबच्या नमुन्यांपैकी ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित यांची संख्या ७४( १) वरून ८५ (१) पर्यंत पोचली आहे. नव्याने आढळून आलेले रुग्ण हे १० हिरेबागेवाडी तर एक रायबाग - कुडचीमधील आहेत. दरम्यान, बेळगाव जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून येण्याची हि तिसरी वेळ आहे. याआधी गेल्या १६ एप्रिल रोजी जिल्ह्यात एकाच दिवशी १७ रुग्ण आढळून आले होते.

त्यानंतर ३० एप्रिल रोजी एकाच दिवशी १४ कोरोना बाधित रुग्णांची जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांच्या संख्येत भर पडली होती. त्यानंतर आता शुक्रवार दि. ८ मे २०२० रोजी जिल्ह्यात ११ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

बेळगाव जिल्ह्यातील ही तिसरी वेळ आहे की दहापेक्षा अधिक रुग्ण एकाच दिवशी आढळून आले आहेत यामुळे सध्या जिल्ह्यातील कोरोना बाधीत यांचा आकडा ८५ वर पोहोचला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbelgaonबेळगाव