शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
6
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
7
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
8
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
9
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
10
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
11
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
12
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
13
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
14
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
15
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
16
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
17
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
18
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
19
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
20
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर

कोरोनामुळे शाहू पुरस्काराचे वितरणही रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:17 IST

इंदुमती गणेश- लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिल्या जाणाऱ्या शाहू पुरस्काराचे वितरण ...

इंदुमती गणेश- लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिल्या जाणाऱ्या शाहू पुरस्काराचे वितरण कोरोनामुळे गेली वर्षभर रखडले आहे. गतवर्षी डॉ. तात्याराव लहाने यांना पुरस्कार जाहीर झाला, शाहू जयंती काही दिवसांवर आली असून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही, या अडचणीच्या पार्श्वभूमीवर आता पुरस्काराचे वितरण कधी, कुठे व कसे करायचे असा पेच तयार झाला आहे.

छत्रपती शाहू महाराज यांची जयंती २६ जूनला साजरी होत आहे, यानिमित्त राजर्षी छत्रपती शाहू मेमोरियल ट्रस्टच्यावतीने दरवर्षी विविध क्षेत्रात आयुष्यभर अतुलनीय कार्य केलेल्या व्यक्तीला शाहू पुरस्काराने सन्मानित केले जाते. जिल्हाधिकारी ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. गेल्यावर्षी डॉ. तात्याराव लहाने यांना हा पुरस्कार जाहीर झाला. मात्र या काळात कोरोनाचा कहर असल्याने पुरस्कार वितरण झाले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यावर जाहीर कार्यक्रमात किंवा त्यांची भेट घेऊन पुरस्कार दिला जाईल, असे जाहीर केले होते. आता शाहूजयंतीला १५ दिवस राहिले आहेत. जिल्ह्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू असून रोजच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत नाही. कोरोना संसर्गाची स्थिती पाहता यंदाचा पुरस्कार सोहळादेखील होण्याची शक्यता नाही. त्यामुळे गेल्यावर्षी जाहीर केलेल्या पुरस्काराचे कधी, कुठे व कसे वितरण करायचे याचा निर्णय ट्रस्टला घ्यावा लागणार आहे.

---

यंदाच्या पुरस्काराचे काय?

शाहू पुरस्कारात आजवर कधी खंड पडलेला नाही, पण यंदा कुणाला पुरस्कार द्यायचा यावर अजून चर्चा झालेली नाही. पुढील काही दिवसांत ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होण्याची शक्यता आहे.

---

काेरोना कमी झाल्यावर शाहू पुरस्कार देण्याचा निर्णय झाला होता, आता अजून दुसरी लाट सुरू आहे, जिल्ह्यातील परिस्थिती इतकी वाईट आहे, जिल्हा प्रशासनावर मोठा ताण आहे. अशा परिस्थितीत अगदीच शेवटचा पर्याय म्हणून डॉ. तात्याराव लहाने यांना घरी भेटून पुरस्कार द्यावा लागेल, पण याचा निर्णय ट्रस्टच्या बैठकीत व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यावर होईल.

प्रा. डॉ. जयसिंगराव पवार

ज्येष्ठ इतिहास संशोधक

--