शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

सदस्य, शिक्षक संघटनांपुढे प्रशासनाचे नमत

By admin | Updated: January 7, 2015 00:55 IST

शालेय क्रीडा स्पर्धा : १९ जानेवारीला प्रारंभ; खोडा घालण्याच्या प्रवृत्तीला लगामे

कोल्हापूर : महापालिका प्राथमिक शिक्षक मंडळातर्फे गेली ५४ वर्षे घेण्यात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धेला प्रशासनाने घातलेला खोडा आज, मंगळवारी दूर झाला. शिक्षक संघटना, मंडळाचे सदस्य व प्रशासन अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत सोमवार, १९ जानेवारीला क्रीडा स्पर्धा घेण्याचे ठरले. १५ हजारांच्या निधीचे कारण पुढे करीत स्पर्धा घेण्याचे टाळणाऱ्या अधिकाऱ्यांना सदस्यांनी फैलावर घेतले.प्राथमिक मंडळाकडे पूर्णवेळ प्रशासन अधिकारी नाही. सध्या राजाराम हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. एम. किल्लेदार यांच्याकडे प्रभारी पदभार आहे. शाळेच्या कामकाजातून त्यांना वेळ देता येत नाही. महापालिकेच्या राजकारणामुळे प्रशासन अधिकारीपदी कोणी कार्यकाल पूर्ण करीत नाहीत. क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचा त्रास कोणी सोसायचा, यापेक्षा स्पर्धाच रद्द करण्याचा घाट अधिकाऱ्यांनी घातला.महापालिका शिक्षण मंडळ दरवर्षी शहरातील महापालिका प्रशाला व इतर खासगी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे क्रीडा महोत्सवाचे आयोजन करते. गेली ५४ वर्षे अखंडपणे या क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. मात्र, यंदाच्या वर्षी निधी नाही; यामुळे या स्पर्धा रद्द करण्यात आल्याचे प्रशासनाने जाहीर केले. याबाबत शिक्षण मंडळ सभापती संजय मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक महासंघ व खासगी प्राथमिक शिक्षक समिती व महासंघ यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये १९ जानेवारीपासून गांधी मैदान येथे या स्पर्धांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मंडळाचे सदस्य अशोक पोवार यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)