शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

थेट अनुदान जमा करण्यास विरोध

By admin | Updated: July 16, 2016 00:22 IST

वैयक्तिक लाभाच्या योजना : स्थायी समिती सभेत दुसऱ्यांदा विषय बारगळला

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण, महिला व बालकल्याणसह विविध विभागांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी थेट अनुदान जमा करावे, या विषयाला शुक्रवारी उपाध्यक्ष तथा कृषी समिती सभापती शशिकांत खोत व समाजकल्याण सभापती किरण कांबळे यांनी विरोध केला. त्यामुळे हा विषय स्थायी समितीच्या सभागृहात दुसऱ्यांदा बारगळला.जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी अध्यक्षा विमल पाटील होत्या. प्रमुख उपस्थिती उपाध्यक्ष शशिकांत खोत, शिक्षण समिती सभापती अभिजित तायशेटे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ज्योती पाटील, बांधकाम समितीच्या सभापती सीमा पाटील, समाजकल्याण समिती सभापती किरण कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, आदींची होती. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण, महिला व बालकल्याणसह विविध विभागांच्या माध्यमातून वैयक्तिक लाभांच्या योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना साहित्य दिले जाते. यामध्ये शिलाई यंत्र, दुधाच्या किटल्या, पिठाची चिक्की, पिको फॉल यंत्र, ताडपत्री, खुरपे, आदी साहित्याचा समावेश आहे. हे साहित्य खरेदी करून ते संबंधित लाभार्थ्याला द्यावे व ते खरेदी करण्यासाठी थेट अनुदानाची रक्कम संबंधित लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करावी, असे मतप्रवाह जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांमध्ये आहे. याच विषयावर शुक्रवारच्या स्थायी समितीच्या सभेत विशेष चर्चा झाली.वैयक्तिक लाभाचे अनुदान लाभार्थ्याच्या खात्यावर थेट जमा करावे, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. त्याला उपाध्यक्ष शशिकांत खोत व समाजकल्याण सभापती किरण कांबळे यांनी थेट विरोध केला. यामुळे हा विषय येथेच थांबला. यापूर्वीच्या स्थायी समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेचे सदस्य धैर्यशील माने यांनी थेट अनुदान जमा करावे, अशी मागणी केली होती. त्यावेळीही तिला विरोध झाला होता. याच प्रश्नावर शुक्रवारी चर्चा झाली; परंतु यावेळी म्हणजे सलग दुसऱ्या वेळीही याला विरोध झाल्याने हा विषय बारगळला. (प्रतिनिधी)