शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

सरवडेच्या बाजारात ठेकेदाराची दादागिरी

By admin | Updated: December 16, 2014 00:21 IST

व्यापाऱ्यांतून नाराजी : कराच्या पावत्या न देण्याचा प्रकार

सरवडे : येथील शुक्रवार या आठवडा बाजारासाठी या विभागातील २० ते २५ गावांतील खेड्यांतून नागरिक येतात. तर जिल्ह्यातून व्यापारासाठी व्यापारी, महिला मोठ्या प्रमाणात येतात. मात्र अलीकडे बाजाराचा ठेका घेतलेल्या युवकांकडून लहान-सहान व्यापारी यांना पावत्या न देताच अरेरावी, उद्धटपणे बोलून ठेका वसूल केला जात आहे. त्यामुळे व्यापारीवर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे आठवड्याचा मोठा बाजार भरतो. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून बाजाराचा ठेका वर्षाकाठी सुमारे दीड लाख रुपयांचा दिला जातो. गेल्या सहा महिन्यांपूर्वी सदर ठेका हा प्रकाश वागवेकर यांना देण्यात आला आहे. या बाजारात गोरगरीब महिला मोठ्या प्रमाणात स्वत:च्या शेतातील पालेभाज्या विक्रीसाठी आणतात, तर अन्य महिलाही रोजगाराची मजुरी पडावी म्हणून भाजीपाल्यांचा वापर करत असतात.व्यापार करणेसाठी असलेल्या जागेचा विचार करून कर आकारणी होते. मात्र ठेकेदारांकडून नियम धाब्यावर बसवून काहींना पावती तर बऱ्याच व्यापाऱ्यांना पावत्या न देता सर्रास अरेरावी व उद्धट बोलून फक्त पावतीचे पैसे घेतले जातात. पावती मागितली तर हुज्जत घालून बाजारात सर्वांचे लक्ष वेधून आपले म्हणणे रेटण्याचा प्रयत्न केला जातो. अशा लोकांकडून २० ते ३० रुपये वसूल केला जात आहे.सरवडे येथे बाजारात सर्व काही तसेच गोरगरिबांना बाजार अशी नागरिकांची भावना, तर चार पैसे गाठीशी राहून आनंदाने बाजार केला, सेवा झाली, अशी व्यापारीवर्गाची भावना असा गेले कितीतरी वर्षे प्रघात सुरू आहे. मात्र अलीकडे त्याला गालबोट लागत आहे. आठवड्यातून एक दिवसाचा बाजार, कुठे हुज्जत घालायची, वैरत्व नको म्हणून काही परगावचे व्यापारी तक्रार करत नाहीत. सर्व नामुष्कीने बोलणे सहन करत आहेत. संबंधित ठेक्यांची चौकशी व्हावी सदरचा ठेका रद्द करा व ग्रामपंचायतीनेच व्यापाऱ्यांकडून वसुली करावी, अशी मागणी होत आहे.बाजाराचा ठेका घेऊन सहा महिने झाले असून, या ठेकेदारासंबंधी वसुलीबाबत यापूर्वी पाच ते सहा तक्रारी आल्या आहेत. यासंबंधी ग्रामपंचायत बैठकीत चर्चा करून निर्णय घेऊ.- जी. डी. आरडे,ग्रामविकास अधिकारी, सरवडे