शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गमानवाडची बॉक्साईट वाहतूक सुरू

By admin | Updated: December 26, 2014 00:54 IST

लोकमत इफेक्ट--दररोज १७० ट्रक भरण्याचा व १५ जानेवारीपर्यंत कामगारांचाही प्रश्न मार्गी लावून त्यापुढे दररोज २५० गाड्या भरण्याची सोय होईल,

सरवडे : राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड येथील हिंडाल्को कंपनी व तेथील मशीन कामगार यांच्यातील वादाचा फटका सुमारे ४०० ट्रकमालकांना बसत होता. त्यामुळे बॉक्साईट वाहतूक असोसिएशनच्यावतीने वाहतूक बंद करण्यात आली होती. यावर हिंडाल्को कंपनीचे अधिकारी, ट्रकमालक असोसिएशनचे पदाधिकारी व ट्रान्स्पोर्टधारकांची बैठक झाली. त्यामध्ये १७० ट्रक भरण्याचे ठरल्यानंतर व अन्य काही सकारात्मक चर्चा झाल्याने दुर्गमानवाडची बॉक्साईट वाहतूक पुन्हा सुरू झाली.यावर्षी १७० ट्रान्स्पोर्ट नावाने ४०० ट्रक बॉक्साईट वाहतूक करीत आहेत. अलीकडे अतिरिक्त माल नेण्याचे बंद केले असून, प्रत्येक ट्रकमधून दहा टनच बॉक्साईट वाहतूक होत होती. कंपनीच्या मशीनवर काम करणाऱ्या २० कामगारांना पगारवाढ हवी होती. त्या वादातून ते ट्रक भरण्यास टाळाटाळ करीत होते. त्यामुळे केवळ शंभर ट्रकच भरले जात होते. त्यामुळे ट्रक मालकांचा व ट्रान्स्पोर्ट चालकांचाही तोटा होत होता. पर्यायाने ट्रकमालक असोसिएश्नच्यावतीने बॉक्साईट वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यासंबंधी शनिवारी (दि. २०) ‘लोकमत’मधून ‘हिंडाल्को कंपनी आणि कामगार वादात चारशे ट्रकना फटका’ बॉक्साईट वाहतूक बंद या शिर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे कंपनी ट्रकमालक व ट्रान्स्पोर्टर यांची बैठक बोलविण्यात आली आणि सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीत दररोज १७० ट्रक भरण्याचा व १५ जानेवारीपर्यंत कामगारांचाही प्रश्न मार्गी लावून त्यापुढे दररोज २५० गाड्या भरण्याची सोय होईल, असा निर्णय झाला.