शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कागलमधील विकासाचे पर्व सुरूच ठेवणार

By admin | Updated: November 18, 2014 23:35 IST

रोजगाराच्या संधी उपलब्ध करू : गडहिंग्लजला औद्योगिक वसाहत; नागनवाडी, आंबेओहळ प्रकल्प पूर्ण करणार

जहाँगीर शेख -- कागल -गेली १५ वर्षे कागल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असताना राज्याच्या मंत्रिमंडळातही ‘मंत्री’ म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या संधीचा उपयोग करीत मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. आता विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम करावे लागणार आहे. गडहिंग्लज येथे औद्योगिक वसाहत उभारणे, नागनवाडी, आंबेओहळ प्रकल्प पूर्ण करणे, मतदारसंघातील उपेक्षित गोरगरीब जनतेला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आणि जनतेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणार असल्याचे माजी जलसंपदा मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.मतदारसंघात विकासाची कामे मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. त्यांची देखभाल, दुरुस्ती ठेवण्यालाही प्राधान्य द्यावे लागेल. मतदारसंघातील कागल, मुरगूड, गडहिंग्लज, उत्तूर अशा काही मोठ्या गावांचा विस्तार होत असल्याने हा नियोजनबद्ध विस्तार व्हावा यासाठी आमदार म्हणून लक्ष देणार आहे. मंत्रिपदाच्या व्यापातून वेळ काढून विकासात्मक कामांचा आढावा घेत होतो. आता हा व्याप नसल्याने अधिक बारकाईने लक्ष देता येईल. नागनवाडी प्रकल्पाचे काम निधीअभावी रखडलेले नाही. जमीन संपादनाच्या कामी अडचणी आल्या आहेत. दूधगंगा कालव्याच्या कामातही हीच अडचण आहे. ती दूर करून हे प्रकल्प येत्या पाच वर्षांत पूर्ण करणार आहे. गडहिंग्लजमधील औद्योगिक वसाहत एका कंपनीच्या न्यायालयीन वादामुळे रखडली आहे. तो वाद सोडवून येथे कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीप्रमाणे मोठे उद्योग निमंत्रित करण्यासाठी वेळ देणार आहे. कागलजवळून गेलेल्या महामार्ग चौपदरीकरण रस्त्याच्या कामात काही त्रुटी राहिल्या आहेत. आता सहापदरीकरण कामाला सुरुवात होणार आहे. त्यामध्ये या त्रुटी दूर करण्यात येतील. मतदारसंघातील सर्व रस्ते दळणवळणाच्या दृष्टीने सुसज्ज केलेले आहेत. आता त्यांची देखभाल करण्याकडे लक्ष देणार आहे. मुश्रीफ फौंडेशनच्यावतीने यापूर्वी जसे विविध सामाजिक उपक्रम राबविले, तसे उपक्रम यापुढेही राबविले जातील. मतदारसंघातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर माझा विशेष भर असेल. कामगार आणि विशेष साहाय्य खात्याच्या माध्यमातून राज्यपातळीवर काही महत्त्वाकांक्षी निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी केली, नियमावली बदलली, काही कायदेही केले. यामुळे राज्यातील लाखो गरीब, उपेक्षित आणि कष्टकरी जनतेला त्याचे लाभ मिळत आहेत. त्यांना अधिक आत्मसन्मान मिळत आहे. मतदारसंघातील जनतेलाही हा लाभ मोठ्या प्रमाणात मिळवून दिला आहे. आता विरोधी पक्षाचा आमदार म्हणून या योजना पूर्वीप्रमाणे चालत राहाव्यात, त्यावर कोणते निर्बंध येऊ नयेत यासाठी मी जागरूकपणे सत्ताधारी पक्षावर लक्ष ठेवण्याचे काम पाच वर्षे करणार आहे. त्यासाठी विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेर रस्त्यावर संघर्ष करावा लागला तरी मी तो करणार आहे. ज्या मोफत उपचार शस्त्रक्रिया योजनेमुळे मला राज्यभर प्रसिद्ध मिळाली, ते काम यापुढेही चालू राहील. मात्र, आता सत्तेवर नसल्याने मला मर्यादा येणार आहेत.(उद्याच्या अंकात आमदार सुरेश हाळवणकर)आमदार हसन मुश्रीफमाझा अजेंडा...!आता मर्यादासत्तेवर असल्याने मी माझा कर्मचारीवर्ग यासाठी नेमला होता. माझा मंत्रिपदाचा बंगला, आमदार निवास येथे रुग्णांचे नातेवाईक राहतील, अशी व्यवस्था केली होती.आता दुसरीकडे व्यवस्था करावी लागणार आहे. शक्य होईल तितका प्रयत्न करणार आहे; पण जनतेनेही या काही मर्यादा समजून घेऊन सहकार्य करावे, असे आवाहनही मी ‘लोकमत’च्या माध्यमातून करीत आहे.होय ! यासाठी आग्रहीविविध शासकीय योजना : विविध शासकीय योजनांचे लाभ यापुढेही गरीब, उपेक्षित घटकांना कायमपणे मिळत राहतील याकडे लक्ष.औद्योगिक प्रकल्पांना प्राधान्य : गडहिंग्लज येथे पूर्ण क्षमतेने औद्योगिक वसाहत तसेच मुरगूड परिसरात एखादा औद्योगिक प्रकल्प सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील.हरितक्रांती : कागल विधानसभा मतदारसंघातील मोठे क्षेत्र आज जलसिंचनामुळे ओलिताखाली आहे. उर्वरित क्षेत्रही ओलिताखाली आणून हरितक्रांती घडविणार.आरोग्य सुविधा : कागल येथील ग्रामीण रुग्णालयात ट्राम केअर सेंटर, मुरगूड, गडहिंग्लज आणि मतदारसंघातील शासकीय आरोग्य यंत्रणा सक्षम करून जनतेला आरोग्य सुविधा देणार.क्रीडांगणे : कागल, गडहिंग्लज, मुरगूड येथे सुसज्ज क्रीडांगणे तसेच मतदारसंघातील प्रमुख गावांत क्रीडांगणे उभारणार.