शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

बांधकाम कामगारांची रविवारी सरकारविरोधात निषेध फेरी

By admin | Updated: April 28, 2016 01:05 IST

सरकारचे दुर्लक्ष : मागण्या मान्य न झाल्यास १६ मेपासून आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे

कोल्हापूर : बांधकाम कामगारांच्या मागण्यांबाबत भाजप सरकारने आश्वासनापलीकडे काहीच दिलेले नाही. दुष्काळात एकीकडे काम नाही आणि दुसरीकडे सुविधा देत नसेल तर सरकारच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी रविवारी (दि. १) निषेध फेरी काढणार असल्याची माहिती लालबावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्षच केले तर दि. १६ मेपासून सहायक आयुक्त कार्यालयाच्या दारात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. मेडिक्लेम योजना सरकारने बंद केली आहे. दिवाळीसाठी पाच हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. मंत्रालयावर मोर्चा काढला. पण श्रेयवादाच्या भूमिकेतून सरकार जाणीवपूर्वक या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. कामगार कल्याण मंडळाकडे ४८०० कोटी शिल्लक आहेत, वर्षाला व्याजापोटी ५०० कोटी रुपये मंडळाला उत्पन्न मिळते. कामगारांना सवलती द्यायच्या म्हटल्या तर व्याजही संपणार नाही पण सरकारची मानसिकता नसल्याने त्यांना जागे करण्यासाठी संघटनेने आक्रमक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून दि. १ मे रोजी काळा झेंडा घेऊन निषेध रॅली प्रत्येक तालुक्यातून काढण्यात येणार आहे यावेळी शिवाजी मगदूम, भगवानराव घोरपडे, प्रकाश कुंभार, संदीप सुतार, दत्ता गायकवाड, आदी उपस्थित होते.