शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कामगारांची दोन हजारावरच बोळवण, संघटना नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 11:44 IST

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांची १५ हजारांची मागणी असताना राज्य सरकारने केवळ २ हजारांचेच अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेवून बोळवण केली आहे. ही कामगारांची खुशमस्करीच असल्याचा आरोप करत महाराष्ट्र बांधकाम कामगार फेडरेशन (सिटु) अंतर्गत सर्व बांधकाम कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देबांधकाम कामगारांची दोन हजारावरच बोळवण शासनाकडून खुशमस्करी; फेरविचार व्हावा

दत्ता पाटीलम्हाकवे/कोल्हापूर : बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांची १५ हजारांची मागणी असताना राज्य सरकारने केवळ २ हजारांचेच अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेवून बोळवण केली आहे. ही कामगारांची खुशमस्करीच असल्याचा आरोप करत महाराष्ट्र बांधकाम कामगार फेडरेशन (सिटु) अंतर्गत सर्व बांधकाम कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.राज्य सरकार व कल्याणकारी मंडळाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि कामगारांना ५ हजारांप्रमाणे पुढील तीन महिने दरमहा अर्थसहाय्य द्यावे अशी मागणी लाल बावटा बांधकाम कामगार संघटना (सिटू) यांनी केली आहे.कामगार विभागाने नोंदीत कामगारांना दोन टप्प्यात ५ हजार रुपये देण्याचा राज्य सरकारला प्रस्ताव केला होता.परंतु आजच राज्य शासनाने राज्यातील सुमारे १२ लाखांहून अधिक नोंदीत बांधकाम कामगारांना २ हजार देण्याचा प्रस्ताव मंजूर करून या कामगारांचा अपेक्षा भंग केला आहे.

कल्याणकारी मंडळाकडे कोट्यवधीचा निधी असताना केवळ दोन हजारांचे अर्थसहाय्य करणे ही कामगारांची थट्टाच आहे. सध्या,काम नसल्यामुळे हे कामगार हवालदिल झाले आहेत.त्यामुळे माय-बाप सरकार आर्थिक हातभार लावतील या अपेक्षेने कामगार डोळे लावून होते. मात्र,आज त्यांची घोर निराशा झाली आहे.संचारबंदीमुळे न्यायहक्कासाठी रस्त्यावर उतरता येत नाही. याबाबत शासनाने फेरविचार करावा. भरमा कांबळेजिल्हाध्यक्ष, लाल बावटा

टॅग्स :Labourकामगारkolhapurकोल्हापूर