शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

महामार्गालगत पंचगंगा नदीच्या रेड झोनमध्ये बांधकामे-: कोणत्या लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या अभयाने मिळते परवानगी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 23:57 IST

प्रत्येक वर्षी पावसाळा सुरू झाला की, पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडते. ही नदी महासागराचे रूप धारण करते आणि पाणी महामार्गावर येऊ लागते. हे माहिती असूनही व्यावसायिक नदीपात्रातच बांधकाम करीत आहेत. नुकताच आॅगस्ट महिन्यात महापूर येऊन जिल्ह्याचा बहुतांश भाग पाण्याखाली गेला होता.

ठळक मुद्दे शिरोलीतील प्रकाराची चौकशी गरजेची शासनाला कधी जाग येणार

शिरोली : शिरोलीत महामार्गालगतच पंचगंगेच्या रेड झोनमध्ये पूररेषेतच दोन्ही बाजूला बांधकामांचा धडाका सुरू आहे. आॅगस्ट महिन्यात आलेल्या महापुराचे पाणी महामार्गावर दहा दिवस होते. तरीही याठिकाणी पुन्हा व्यावसायिक पक्की बांधकामे करीत आहेत. मोठे व्यवसाय, मॉल उभारले जात आहेत. रेडझोनमधील या धोकादायक व्यवसायांना कोणत्या शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधीच्या अभयाने परवानगी मिळत आहे. याची चौकशी होणे गरजेचे आहे.

शिरोली हे बाजारपेठेचे ठिकाण आहे. शिरोलीतूनच पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग आणि सोलापूर -कोल्हापूर-रत्नागिरी हा राज्यमार्गही या गावातूनच गेलेला आहे. हाकेच्या अंतरावर शेजारी कोल्हापूर शहर आहे. गांधीनगर येथे कपड्यांची मोठी बाजारपेठ आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी एमआयडीसी शिरोलीत आहे. शिरोली सांगली फाटा ते पंचगंगा नदीच्या पुलापर्यंत एक किलोमीटर अंतरावर महामार्गाच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील बाजूस असणाºया पिकाऊ शेतीत २५ फूट भर टाकून या जागेचा वापर हा व्यवसाय उभारण्यासाठी होत आहे. प्रत्येक वर्षी पावसाळा सुरू झाला की, पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडते. ही नदी महासागराचे रूप धारण करते आणि पाणी महामार्गावर येऊ लागते. हे माहिती असूनही व्यावसायिक नदीपात्रातच बांधकाम करीत आहेत. नुकताच आॅगस्ट महिन्यात महापूर येऊन जिल्ह्याचा बहुतांश भाग पाण्याखाली गेला होता. पुणे-बंगलोर महामार्गावर सुमारे दहा फूट पाणी आले होते. आठ दिवस महामार्गावरील वाहतूक बंद होती. महामार्गाशेजारी बांधलेले सर्व फर्निचर मॉल, ट्रॅक्टर शोरूम, हॉटेल पाण्याखाली गेले होते. सर्व साहित्य वाहून गेले तरी पुराचे पाणी ओसरल्यानंतर पुन्हा या ठिकाणी व्यावसायिकांनी बांधकामे सुरू केली आहेत.

सन २००५-०६ ला आलेल्या महापुरावेळी पंचगंगा नदीची पूररेषा (रेडझोन) पूर्वेकडील बाजूस कोरगावकर पेट्रोल पंप आणि पश्चिमेकडील बाजूस शेतकरी संघाचा पेट्रोल पंप येथे आहे, याची नोंदही पाटबंधारे आणि ग्रामविकास खात्यात गाव तलाठी  कार्यालयात आहे. हे संबंधित ग्रामपंचायतीला, तहसीलदार, प्रांताधिकारी यांना माहित आहे. तरी याठिकाणी व्यवसायासाठी परवानगी मिळतेच कशी? हाच खरा प्रश्न आहे.

जिल्हाधिकारी कारवाई कधी करणार ?महापुराचे पाणी तब्बल दहा दिवस महामार्गावर होते. महापुराच्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पूररेषेतील बांधकामे काढणार, असे सांगितले होते. आता तर शिरोलीशेजारी महामार्गावर दोन्ही बाजूला पक्की बांधकामे सुरू आहेत. मग, जिल्हाधिकारी गप्प का आहेत, की पुन्हा महापुराचे पाणी येऊन संपूर्ण शिरोली गाव पाण्याखाली जाण्याची वाट बघत आहेत. यावर कारवाई कधी होणार ? असा प्रश्न विचारला जात आहे.

 

पूररेषेत बांधलेल्या बांधकामांना शिरोली ग्रामपंचायतीने कोणतीही परवानगी दिलेली नाही. कारण बांधकाम परवाना हा प्राधिकरण कार्यालयातून घ्यावा लागतो. आम्ही सत्तेत आल्यापासून कोणताही बांधकाम परवाना दिलेला नाही. तसेच पूररेषेत नुकसान झाले म्हणून हे व्यावसायिक पंचनामा करून पत्र द्या, अशी मागणी करीत होते; पण आम्ही कुणालाही पत्र दिलेले नाही. पूररेषेतील बांधकामे काढावीत, याबाबत जिल्हाधिकारी आणि इचलकरंजीचे प्रांताधिकारी यांच्याकडे पाठपुरावाही केला आहे.- शशिकांत खवरे, सरपंच.