शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात ‘कृषी भवन’ उभारू

By admin | Updated: May 8, 2016 00:44 IST

तांदूळ महोत्सव सुरू : चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा; सोमवारपर्यंत चालणार

कोल्हापूर : कृषी विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली आणून तिथे शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन व्हावे, यासाठी कोल्हापुरात ‘कृषी भवन’ उभे करणार असून त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. महाराष्ट्राला दिशादर्शक असे कृषी भवन उभारण्यासाठी अधिकाऱ्यांनी कामाला लागावे, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ‘आत्मा’च्या वतीने शनिवारपासून सोमवार (दि. ९) पर्यंत भगवा चौक, कसबा बावडा येथे सकाळी नऊ ते रात्री १० पर्यंत तांदूळ महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक होते. मंत्री पाटील म्हणाले, ‘कोल्हापुरात ‘कृषी’ची सर्व कार्यालये एकाच छताखाली येऊन तिथे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र उभे करण्याचा मानस असून महाराष्ट्राला दिशा देईल असे कृषी भवन उभे करण्यासाठी अधिकाऱ्यांनी कामाला लागावे, तांदूळ महोत्सवात खात्रीशीर वाण मिळत असल्याने ग्राहकांनी जास्तीत जास्त तांदूळ खरेदी करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. यंदा ‘जलयुक्त शिवार’च्या माध्यमातून चांगली कामे झाल्याने आगामी काळात पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही. आठवडी बाजाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न असून आतापर्यंत मुंबई, नागपूर व पुणे येथे २६ आठवडे बाजार केले आहेत. कोल्हापुरात पणन विभागाचे अधिकारी जागा शोधत आहेत.’ खासदार महाडिक म्हणाले, तांदूळ महोत्सव सुरुवातीला पथदर्शी प्रकल्प होता, तो संपूर्ण राज्याने स्वीकारला. शेतीमालाला ‘एमआरपी’ नाही; पण येथे शेतकऱ्यांना स्वत:च दर ठरविण्याची मुभा आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. एन. टी. शिसोदे, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, नगरसेवक अशोक जाधव, किरण घाटगे, आदी उपस्थित होते. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी गर्दी केली होती.