शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत १५० ठिकाणी कचऱ्याच्या पेट्यांची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 23:13 IST

इचलकरंजी : स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात विविध ठिकाणी ओला व सुका कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र पेट्या बसविण्यास नगरपालिकेने सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देनगरसेवकांत मात्र स्वच्छतेबाबत उदासिनताओल्या-सुक्या कचऱ्याच्या पेट्या ठरताहेत लक्षवेधीपालिकेकडून ३९ लाख रुपये खर्च

इचलकरंजी : स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात विविध ठिकाणी ओला व सुका कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र पेट्या बसविण्यास नगरपालिकेने सुरुवात केली आहे. नगरपालिकेकडील आरोग्य व स्वच्छता विभागाने ३९ लाख रुपये खर्च करून १५० पेट्यांच्या या जोड्या प्रमुख रस्त्यांवर बसविल्या जात आहेत. रस्त्याच्या कडेला मोक्याच्या ठिकाणी ‘आ’ वासून लटकलेल्या या पेट्या नागरिकांना लक्षवेधी ठरत आहेत. स्वच्छतेबाबत अत्यावश्यक असलेला नगरसेवकांचा सहभाग मात्र दिसून येत नाही.स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील अंतर्गत स्वच्छतेसाठी चौदाव्या वित्त आयोगातून नगरपालिकेने कचरा गोळा करणाºया ३०० पेट्या खरेदी केल्या आहेत.३८ लाख ९५ हजार रुपयांच्या या पेट्या ५० जोड्यांच्या तीन टप्प्यांमध्ये रस्त्यावर बसविण्यास सुरुवात केली आहे. सध्या स्टेशन रोड ते नदीवेस नाका व करवीर नाका ते राजवाडा चौक या प्रमुख रस्त्यांवर प्रत्येक ५०० मीटरवर कचरा पेट्या बसविल्या जात आहेत.

रस्त्याच्या कडेला, तसेच प्रमुख चौकांच्या बाजूस हिरव्या व निळ्या रंगाच्या पेट्या जमिनीमध्ये खड्डा काढून कॉँक्रिटच्या सहायाने बसविण्यास सुरुवात झाली आहे. हिरव्या पेट्यांमध्ये ओला कचरा व निळ्या पेट्यांमध्ये सुका कचरा टाकावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून नगरपालिकेने केली आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये नजरेत भरेल, अशा मोक्याच्या ठिकाणी या पेट्या लटकलेल्या अवस्थेत ‘आ’ वासून उभ्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे लक्ष वेधण्याबरोबरच एक विचित्र अनुभव देणाºया या पेट्या ठरू लागल्या असल्यामुळे शहरात तो चर्चेचा विषय झाला आहे.

नगरपालिकेमध्ये ६२ निवडून आलेले व पाच स्वीकृत नगरसेवक आहेत. स्वच्छता अभियानामध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांचा सहभाग मात्र दिसून येत नाही. घंटागाडीमध्ये ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे टाकणे, नगरसेवकांनी स्वत:च्या प्रभागामध्ये कचरा स्वतंत्र ठेवण्यासाठी पेट्या देणे, गृहनिर्माण संस्था किंवा अपार्टमेंटमध्ये ओला कचरा साठवून त्यापासून कंपोस्ट खत तयार करणे, प्रभागातील मंगल कार्यालयाकडे निर्माण होणाºया ओल्या कचºयाची योग्य विल्हेवाट लावणे, याबाबत नगरसेवक व नगरसेविकांचे सहकार्य आवश्यक असतानाही त्यांच्यामध्ये उदासिनता दिसून येत आहे.कचºयापासून कंपोष्ट खत१ नगरपालिकेच्यावतीने शहरातील रहिवासी व औद्योगिक अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये ओला व सुका कचरा स्वतंत्र साठविणे आणि तो घंटागाडीमध्ये टाकणे, याबाबतचे आवाहन करणाºया जाहिराती घर किंवा कारखान्याच्या दारावर चिकटविण्यात आल्या आहेत.२ त्याचप्रमाणे राजीव गांधी भवन व भगतसिंग उद्यान या ठिकाणी ओल्या कचºयापासून कंपोस्ट खतनिर्मिती करण्याचे काम नगरपालिका करीत आहे. अशा प्रकारची खतनिर्मिती शहरातील अन्य उद्यानांतूनसुद्धा केली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे यांनी दिली.