शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

बांधकाम सभापती भाऊसाहेब आवळे

By admin | Updated: December 23, 2014 00:37 IST

इचलकरंजी पालिका : पाणीपुरवठा सभापतिपदी रवी रजपुते, राष्ट्रवादीतील जांभळे, कारंडे गटात जोरदार वाद

इचलकरंजी : नगरपालिकेकडील विविध विषय समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे अनेक राजकीय घडामोडी घडल्या. नाट्यमय घडामोडीनंतर प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बांधकाम समितीचे सभापतिपद भाऊसाहेब आवळे व पाणीपुरवठा समितीचे सभापतिपद रवी रजपुते यांना मिळाले. सत्तारूढ कॉँग्रेस आघाडीतील राष्ट्रवादी कॉँग्रेसअंतर्गत जांभळे व कारंडे गटांत जोरदार वाद झाला.विविध विषय समित्यांची एक वर्षाची मुदत संपुष्टात आल्याने पालिकेकडील बांधकाम, पाणी, शिक्षण, आरोग्य व महिला-बालकल्याण या समित्यांची निवडणूक आज, सोमवारी झाली. निवडून आलेल्या ५७ नगरसेवकांसाठी या पाच समित्यांमध्ये प्रत्येकी पक्षीय बलाबलप्रमाणे कॉँग्रेस १०, राष्ट्रवादी ३ व शहर विकास आघाडीचे ६ अशा १९ नगरसेवकांचा समावेश करण्यात आला. सभापतिपदासाठी इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत दुपारी ३ ते ३.३० वाजेपर्यंत दिली होती. मात्र, प्रत्येक समितीसाठी सत्तारूढांकडून एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला.पालिकेच्या सभागृहात झालेल्या निवडणुकीसाठी विरोधी शहर विकास आघाडीचे सर्व नगरसेवक अनुपस्थित राहिले. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या कारंडे गटाच्या लतिफ गैबान, विठ्ठल चोपडे, शुभांगी माळी व माधुरी चव्हाण यांनीही सभेवर बहिष्कार टाकला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतिपदी भाऊसाहेब आवळे, पाणीपुरवठा समितीच्या सभापतिपदी रवी रजपुते, शिक्षण, क्रीडा-सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापती म्हणून शोभा कांबळे, आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापतिपदी सुजाता बोंगाळे, महिला व कल्याण समितीच्या सभापती म्हणून प्रमिला जावळे व उपसभापतिपदी पारूबाई चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. दरम्यान, राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील कारंडे गटाला या निवडणुकीत स्थान मिळाले नसल्याने नगरपालिका आवारात आलेल्या नगरसेविका शुभांगी माळी व माधुरी चव्हाण यांनी नवनिर्वाचित सभापती आवळे यांना बोलावून घेतले. त्यांनी कारंडे गटाचा विचार न करता सभापतिपद स्वीकारल्याबद्दल त्यांना जाब विचारला. यावेळी या दोघींच्या पतीनीसुद्धा साथ दिली. आजच्या या घटनेने राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये असलेल्या गटबाजीचे दर्शन घडले. याच प्रकारची चर्चा आज नगरपालिका वर्तुळात जोरदारपणे होती. चोपडे सलग दोनदा वंचित४राष्ट्रवादी कॉँग्रेसचे विठ्ठल चोपडे हे पालिकेच्या कामकाजात सातत्याने विरोध करतात. त्याचा राग जांभळे गटावर आहे. त्यामुळे त्यांचाही समावेश कोणत्याही समितीत झाला नाही. सातत्याने दोनवेळा चोपडे यांना वंचित ठेवण्यात आले. ४याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद रवींद्र माने यांनी, चोपडे यांना कोणत्याही समितीत स्वारस्य नसल्याचे त्यांनीच सांगितल्याचे स्पष्ट केले; पण आपण माने यांना काहीही सांगितले नसल्याचे चोपडे म्हणाले.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे पडसाद आजच्या पालिका विषय समित्यांच्या निवडणुकीत उमटले. विधानसभा निवडणुकीत ‘शविआ’ने कॉँग्रेसचे उमेदवार प्रकाश आवाडे यांना विरोध केला; पण या निवडणुकीत नगरसेवक मोहन कुंभार, नगरसेविका लक्ष्मी बडे व आक्काताई अवाळे यांनी कॉँग्रेसला पाठिंबा दिला. परिणामी या तिन्ही नगरसेवकांना कोणत्याही समितीत स्थान देण्यात आले नाही.४महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रमिला जावळे या सलग तिसऱ्यांदा सभापती झाल्या. ही समिती आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने काहीशी दुर्लक्षित राहिली आहे. ४परिणामी या समितीचे सभापतिपद स्वीकारण्याचा दावा कुणीही केला नसल्याने जावळे यांच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडली, अशी पालिका वर्तुळात चर्चा होती.