शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जनता बेघर राहावी हे समरजित घाटगेंचे षड्यंत्र

By admin | Updated: July 1, 2017 01:06 IST

जनता बेघर राहावी हे समरजित घाटगेंचे षड्यंत्र

लोकमत न्यूज नेटवर्ककागल : कागलमध्ये एका घरात चार-चार कुटुंबे राहतात. धाडसाने १००२ घरांची घरकुल योजना शहरात राबविली. ही आमदार मुश्रीफ यांनी चूक केली काय? आठ लाखांचे घर पन्नास हजारांत जर मिळत असेल तर समरजित घाटगे तुमच्या पोटात का दुखतंय? कागलची जनता गरीब, बेघर राहावी, हे समरजित घाटगेंचे षड्यंत्र आहे, अशी टीका जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने यांनी केली. घरकुल योजनेबद्दल भाजप, मित्र पक्षांनी गुरुवारी काढलेल्या मोर्चाचा निषेध म्हणून शुक्रवारी काँग्रेस पक्ष - मित्र आघाडी यांच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. नगरपालिकेजवळ या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. तेव्हा भैया माने बोलत होते. भैया माने म्हणाले की, तुम्ही ‘म्हाडा’चे अध्यक्ष आहात. आम्ही जागा देतो. तुम्ही घरकुलाच्या किमतीत घर बांधून दाखवा; पण गोरगरिबाची चेष्टा थांबवा. शाहूंचे वारसदार म्हणता आणि जातीयवादी बोलता? शाहू दूध संघातील भ्रष्टाचाराबद्दल उत्तर द्या. कागलच्या युवकांची, गरिबांची बदनामी थांबवा अन्यथा राजा विरुद्ध प्रजा हा नवा संघर्ष सुरू होईल. घरकुलाच्या कोणत्याही चौकशीला आम्ही तयार आहोत. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, रमेश माळी उपनगराध्यक्ष नितीन दिंडे, अजित कांबळे, पक्षप्रतोद प्रवीण काळबर, चंद्रकांत गवळी, आदींची भाषणे झाली. ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, अशोक जकाते, नगरसेवक - नगरसेविका कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. मोर्चात घरकुल लाभार्थींची मोठी गर्दी होती. शहर अध्यक्ष संजय चितारी यांनी आभार मानले. ...तर राजीनामा : प्रवीण काळबरसमरजित घाटगेंनी निपाणी-संकेश्वरमधील मुस्लिमांना घरे दिली आणि कागलच्या गरीब मुसलमानांना वंचित ठेवले, असा धादांत खोटा आरोप केला आहे. १००२ लोकांच्या यादीत निपाणी, संकेश्वर, मिरज येथील एक जरी नाव असेल तर सिद्ध करा, नगरसेवकपदाचा राजीनामा देतो. शाहूंच्या विचारांचे वारस असणाऱ्या मुश्रीफसाहेबांची राजकारणासाठी बदनामी करू नका, असे पक्षप्रतोद काळबर यांनी सांगितले. सिंह, गिधाडे, गाढव आणि अस्वल, शेळी गुरुवारी घाटगे यांनी सिंहाची मिरवणूक गिधाडे, गाढव काढू शकत नाहीत, अशी टीका केली होती. प्रकाश गाडेकर यांनी, तुम्ही सिंह नाही शेळी आहात. वाघाच्या जबड्यात हात घालू नका असे सांगितले. शाहू दूध संघाचा तोटा शाहू साखर कारखान्यातून भरून काढून मोठा भ्रष्टाचार केला जात आहे, असा आरोपही करण्यात आला.