शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

नव्या आयटी पार्कसाठी संभापूर-कासारवाडी दरम्यानच्या जागेचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST

कोल्हापूर : येथील शंभर एकर जागेमध्ये मोठा आयटी पार्क उभारण्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी केली. त्यानंतर त्यांनी ...

कोल्हापूर : येथील शंभर एकर जागेमध्ये मोठा आयटी पार्क उभारण्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी केली. त्यानंतर त्यांनी कोल्हापुरात सध्या कार्यान्वित असलेल्या आयटी उद्योगाची मागविलेली माहिती आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूरच्यावतीने सोमवारी सायंकाळी त्यांना सादर करण्यात आली. संभापूर-कासारवाडी दरम्यानच्या जागेमध्ये नवा पार्क करण्याचा उद्योगमंत्री देसाई यांचा विचार आहे. त्याबाबत आज, मंगळवारी मुंबईत बैठक होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अधिकाऱ्यांच्या माध्यमातून उद्योगमंत्री देसाई यांनी कोल्हापुरातील स्थानिक आयटी उद्योगाबाबतची माहिती मागविली. त्यानुसार आयटी असोसिएशनची स्थापना, त्यामागील उद्देश, जिल्हा आयटी धोरण, स्थानिक आयटी पार्क होण्यासाठी असोसिएशनने केलेला पाठपुरावा, त्यावर महानगरपालिकेने आरक्षित केलेली जागा आणि याबाबत आतापर्यंत झालेली कार्यवाही, आदी स्वरूपातील माहिती असोसिएशनने सादर केली आहे. कोल्हापुरात मोठा पार्क होणार असेल, तर चांगले आहे. मात्र, स्थानिक आयटी पार्क होण्याचा प्रश्नही लवकर मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी केली असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष शांताराम सुर्वे यांनी दिली.

दरम्यान, नवा आयटी पार्क जिल्ह्यातील संभापूर ते कासारवाडी दरम्यानच्या शंभर एकर जागेत करण्याचा विचार उद्योगमंत्री देसाई यांचा आहे. या पार्कसाठी जागा देण्याची तयारी तेथील जागा मालकांनी केली आहे. मुंबईतील बैठक झाल्यानंतर आठवड्याभरात जागेची पाहणी करण्यासाठी उद्योग विभागातून समिती येण्याची शक्यता आहे.

चौकट

स्थानिक उद्योजकांची मदत घ्यावी

जिल्ह्यात मोठ्या आयटी कंपन्या आल्या, तर त्यामुळे स्थानिक आयटी उद्योगांना नव्या संधी उपलब्ध होतील. बाहेरून कोल्हापूरमध्ये येणाऱ्या कंपन्यांना त्यांनी आऊट सोर्सिंगसाठी येथील स्थानिक उद्योजकांची मदत घ्यावी. त्याबाबतची अट त्यांना सरकारने घालावी. आयटी उद्योगासाठी आवश्यक असणारी इको सिस्टीम विकसित करण्यावरही सरकारने भर द्यावा, अशी मागणी आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूरचे माजी अध्यक्ष ओंकार देशपांडे यांनी केली.