शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

सभेत जाणीवपूर्वक गोंधळ : वरुट

By admin | Updated: August 11, 2014 00:18 IST

शिक्षक बँकेचे राजकारण : विरोधकांची समांतर सभा; सर्व विषय नामंजूरे

शिक्षक बँकेचे राजकारण : विरोधकांची समांतर सभा; सर्व विषय नामंजूरेकोल्हापूर : सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे देत असताना विरोधकांनी जाणीवपूर्वक गोंधळ करून सभेला गालबोट लावले. गेली पाच वर्षे सभासदाभिमुख कारभार करत डबघाईला आलेली बॅँक आदर्श बनविली; पण राजकीय हेतूने प्रेरित होऊन चांगल्या बॅँकेची बदनामी करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केल्याची खंत प्राथमिक शिक्षक बॅँकेचे अध्यक्ष राजाराम वरुटे यांनी व्यक्त केली. यावेळी अहवालावरील सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिल्याचेही त्यांनी सांगितले. बॅँकेच्या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना अध्यक्ष वरुटे म्हणाले, बॅँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पाच तास सभा चालली. सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न होता; पण विरोधकांना सभा उधळायची होती. त्यामुळेच प्रत्येक प्रश्नाला आडवणूक करून कोंडी करण्याचा प्रयत्न केला. गेल्या पाच वर्षांत संचालक मंडळाने पारदर्शक कारभार केला आहे. अहवालाच्या प्रत्येक पानावर सभेतच नव्हे, तर कधीही येऊन आमच्याशी चर्चा करण्याची तयारी आहे. सभेत अनेकवेळा शांत राहण्याचे आवाहन करूनही विरोधकांनी ठरवून बॅँकेची बदनामी केली आहे. गेल्या चार सभा अत्यंत शांततेत झाल्या. केवळ निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून काही मंडळी एकत्र आली आहेत. जी मंडळी स्वच्छ कारभाराचा डांगोरा पिटत आहेत, त्यांचा इतिहास सभासदांना माहिती आहे. प्रसाद पाटील यांच्या शाहू शिक्षक पतसंस्थेची अवस्था काय आहे? पतसंस्थेच्या अहवालात त्यांनी आॅडिट वर्ग का छापला नाही? अशी विचारणा करत बॅँकेचा व्याजदर कमी करा म्हणणाऱ्यांच्या पतसंस्थेचा व्याजदर १४ टक्के कसा? असा सवालही अध्यक्ष वरुटे यांनी केला. जयघोष आणि निषेधसभा संपल्यानंतर विरोधकांनी एकच गोंधळ करण्यास सुरुवात केल्याने सत्तारूढ गटाच्या समर्थकांनीही जल्लोष सुरू केला. आपल्या नेत्यांचा जयघोष करत विरोधकांच्या निषेधाच्या घोषणा दिल्याने सभास्थळावरील वातावरण चांगलेच तणावपूर्वक निर्माण झाले होते. निवडणुकीची किनारआजच्या सभेला बॅँकेच्या आगामी निवडणुकीची किनार दिसत होती. राजाराम वरुटे यांच्या सर्व विरोधकांनी एकत्रित येऊन त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. ‘वॉटस अ‍ॅप’वरून प्रश्नसभेपूर्वी चार दिवस अगोदर लेखी प्रश्न विचारण्याचे आवाहन बॅँकेच्या वतीने केले होते.लेखी प्रश्नांबरोबरच अध्यक्ष वरुटे यांच्या मोबाईलवर ‘वॉटस अ‍ॅप’द्वारेही प्रश्न विचारले होते. व्याज विवरणावरून खडाजंगीअहवालात दाखवलेल्या व्याज विवरणावर आक्षेप घेत सभासदांकडून चक्रवाढ दराने व्याज आकारणी होत असल्याचे रवळू पाटील यांनी सांगितले. यावरून सत्तारूढ व विरोधकांत चांगलीच खडाजंगी उडाली. अखेर अध्यक्ष वरुटे यांनी सरळव्याजानेच आकारणी होत असल्याचे पटवून दिले. संचालकांना एकेरी भाषापन्हाळा शाखेत कर्ज मिळत नसल्याचा आरोप करत रघुनाथ चौगले यांनी संचालक रघुनाथ खोत यांच्याविषयी एकेरी भाषा वापरल्याने गोंधळ उडाला. खोत यांचे समर्थक चौगले यांच्या अंगावर धावून गेल्याने पंधरा मिनिटे झोंबाझोंबी झाली. अखेर कृष्णात कारंडे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर या वादावर पडदा पडला.