शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
4
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
5
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
6
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
7
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
8
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
9
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
10
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
11
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
12
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
13
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
14
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
15
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
16
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
17
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
18
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
19
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
20
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?

सभेत जाणीवपूर्वक गोंधळ : वरुट

By admin | Updated: August 11, 2014 00:18 IST

शिक्षक बँकेचे राजकारण : विरोधकांची समांतर सभा; सर्व विषय नामंजूरे

कोल्हापूर : सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे देत असताना विरोधकांनी जाणीवपूर्वक गोंधळ करून सभेला गालबोट लावले. गेली पाच वर्षे सभासदाभिमुख कारभार करत डबघाईला आलेली बॅँक आदर्श बनविली; पण राजकीय हेतूने प्रेरित होऊन चांगल्या बॅँकेची बदनामी करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केल्याची खंत प्राथमिक शिक्षक बॅँकेचे अध्यक्ष राजाराम वरुटे यांनी व्यक्त केली. यावेळी अहवालावरील सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिल्याचेही त्यांनी सांगितले. बॅँकेच्या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना अध्यक्ष वरुटे म्हणाले, बॅँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पाच तास सभा चालली. सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न होता; पण विरोधकांना सभा उधळायची होती. त्यामुळेच प्रत्येक प्रश्नाला आडवणूक करून कोंडी करण्याचा प्रयत्न केला. गेल्या पाच वर्षांत संचालक मंडळाने पारदर्शक कारभार केला आहे. अहवालाच्या प्रत्येक पानावर सभेतच नव्हे, तर कधीही येऊन आमच्याशी चर्चा करण्याची तयारी आहे. सभेत अनेकवेळा शांत राहण्याचे आवाहन करूनही विरोधकांनी ठरवून बॅँकेची बदनामी केली आहे. गेल्या चार सभा अत्यंत शांततेत झाल्या. केवळ निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून काही मंडळी एकत्र आली आहेत. जी मंडळी स्वच्छ कारभाराचा डांगोरा पिटत आहेत, त्यांचा इतिहास सभासदांना माहिती आहे. प्रसाद पाटील यांच्या शाहू शिक्षक पतसंस्थेची अवस्था काय आहे? पतसंस्थेच्या अहवालात त्यांनी आॅडिट वर्ग का छापला नाही? अशी विचारणा करत बॅँकेचा व्याजदर कमी करा म्हणणाऱ्यांच्या पतसंस्थेचा व्याजदर १४ टक्के कसा? असा सवालही अध्यक्ष वरुटे यांनी केला. जयघोष आणि निषेधसभा संपल्यानंतर विरोधकांनी एकच गोंधळ करण्यास सुरुवात केल्याने सत्तारूढ गटाच्या समर्थकांनीही जल्लोष सुरू केला. आपल्या नेत्यांचा जयघोष करत विरोधकांच्या निषेधाच्या घोषणा दिल्याने सभास्थळावरील वातावरण चांगलेच तणावपूर्वक निर्माण झाले होते. निवडणुकीची किनारआजच्या सभेला बॅँकेच्या आगामी निवडणुकीची किनार दिसत होती. राजाराम वरुटे यांच्या सर्व विरोधकांनी एकत्रित येऊन त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. ‘वॉटस अ‍ॅप’वरून प्रश्नसभेपूर्वी चार दिवस अगोदर लेखी प्रश्न विचारण्याचे आवाहन बॅँकेच्या वतीने केले होते.लेखी प्रश्नांबरोबरच अध्यक्ष वरुटे यांच्या मोबाईलवर ‘वॉटस अ‍ॅप’द्वारेही प्रश्न विचारले होते. व्याज विवरणावरून खडाजंगीअहवालात दाखवलेल्या व्याज विवरणावर आक्षेप घेत सभासदांकडून चक्रवाढ दराने व्याज आकारणी होत असल्याचे रवळू पाटील यांनी सांगितले. यावरून सत्तारूढ व विरोधकांत चांगलीच खडाजंगी उडाली. अखेर अध्यक्ष वरुटे यांनी सरळव्याजानेच आकारणी होत असल्याचे पटवून दिले. संचालकांना एकेरी भाषापन्हाळा शाखेत कर्ज मिळत नसल्याचा आरोप करत रघुनाथ चौगले यांनी संचालक रघुनाथ खोत यांच्याविषयी एकेरी भाषा वापरल्याने गोंधळ उडाला. खोत यांचे समर्थक चौगले यांच्या अंगावर धावून गेल्याने पंधरा मिनिटे झोंबाझोंबी झाली. अखेर कृष्णात कारंडे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर या वादावर पडदा पडला.