शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आजरा कारखान्यासाठी आतापासूनच जोडण्या

By admin | Updated: January 22, 2016 00:52 IST

तीन पॅनेलची शक्यता : अशोकअण्णांची फिल्डिंग; विरोधक निवांतच

ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा साखर कारखान्याची निवडणूक मे २0१७ च्या दरम्यान होत असली, तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेचे संचालक व आजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अशोक चराटी यांनी सुरुवातीपासूनच सावध पण नेटकी फिल्ंिडग लावण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीला सामोरे जायचे त्याकरिता आतापासूनच कामाला लागा, असा संदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. एकीकडे अशोकअण्णांनी नेटकी फिल्डिंग लावल्यानंतरही विरोधक मात्र निवांतच दिसत आहेत.निवडणुकीत ज्या घडामोडी होतील त्या होतील, परंतु सद्य:स्थितीला अशोकअण्णा हे सत्तेचे प्रबळ दावेदार दिसत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यात प्रत्येक निवडणुकीत अशोकअण्णा उजवे ठरले आहेत. अंतर्गत दगाबाजीने तालुका संघाच्या निवडणुकीत सत्तेपासून दूर जावे लागले असले, तरी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची कारखाना निवडणुकीत व्यवस्थित काळजी घेतली जात आहे.स्वबळावर लढण्याची तयारी ठेवणारे चराटी जे सोबत येतील त्यांना घेऊन पुढचे पाऊल टाकतील, हे स्पष्ट आहे. दुसरीकडे विरोधक मात्र अंतर्गत खेळ्या करून आपल्याच पदरात जास्तीत जास्त कशा जागा पडतील याकरिता प्रयत्नशील दिसत आहेत. मुळात कारखाना निवडणुकीत तीन पॅनेल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांपुढे तीन पर्याय राहणार आहेत. एकाने डावलल्यास दुसरा मार्ग खुला राहणार आहे; परंतु त्यातल्या त्यात प्रबळ पर्याय म्हणजे अशोकअण्णांची आघाडी व त्यांच्या विरोधातील मुख्य आघाडी असाच आहे. सुरुवातीलाच ‘गोकुळ’चे रवींद्र आपटे यांच्यासह काही संचालक व संघटनांनी त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे जाहीर केले आहे.विरोधी मंडळी एकत्र येणारआमदार प्रकाश आबिटकर, रवींद्र आपटे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह प्रमुख मंडळींची रसद अशोकअण्णांना राहणार आहे. अशोकअण्णांची सुरू असलेली तयारी, अशोकअण्णांच्या विरोधातील मंडळींच्या एकत्र येण्यात असणाऱ्या राजकीय अडचणी, यांवर लक्ष ठेवून असणारे काही प्रमुख नेते प्रसंग पडल्यास तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाता येईल का, याची चाचपणी करू लागले आहेत. एकंदर कारखाना निवडणूक घडामोडींमध्ये कार्यकर्त्यांची मोट बांधण्यात अशोकअण्णा आघाडीवर दिसत आहेत.