शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२०१९ मध्ये काँग्रेसच सत्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:07 IST

उचगाव : देशात बदलाचे वारे वाहू लागले असून, २०१९ मध्ये राष्टÑीय काँग्रेस पक्षच सत्तेवर असेल. कंजारभाट समाजाच्या उन्नतीसाठी आमदार सतेज पाटील यांनी कार्य केले आहे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.उजळाईवाडी येथे २७ गावांतील कंजारभाट समाजातील व्यक्तींसाठी दिलेल्या पाच एकर जागा स्मशानभूमीचा ...

उचगाव : देशात बदलाचे वारे वाहू लागले असून, २०१९ मध्ये राष्टÑीय काँग्रेस पक्षच सत्तेवर असेल. कंजारभाट समाजाच्या उन्नतीसाठी आमदार सतेज पाटील यांनी कार्य केले आहे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.उजळाईवाडी येथे २७ गावांतील कंजारभाट समाजातील व्यक्तींसाठी दिलेल्या पाच एकर जागा स्मशानभूमीचा लोकार्पण सोहळा सरस्वती मंगल कार्यालय येथे पार पडला. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, सतेज पाटील यांनी एखादा विषय लावून धरला, तर तो तडीस गेल्याशिवाय सोडत नाही. कंजारभाट समाज हा भटकंती करणारा वंचित राहिलेला घटक आहे. त्यांच्या पिढ्यान्पिढ्यांची सोय व्हावी म्हणून सतेज पाटील यांनी स्मशानभूमीसाठी पाच एकर जागेची मागणी केली. त्या जागेला मंजुरी देण्याचे काम आपण केले. काँग्रेसने केलेली विकासकामे आजही लोकांच्या लक्षात आहेत.आमदार सतेज पाटील म्हणाले, पूर्वीच्या काळात कंजारभाट समाजाला पोलीस वेठीस धरायचे, त्यांच्यावर चूक नसताना त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक मिळायची, हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून गृहराज्यमंत्री असताना या समाजाला न्याय देण्याची जबाबदारी पार पाडली. कंजारभाट समाजाची पूर्वीपासूनची दफनभूमीची पाच एकर जागा माजी महसूलमंत्री थोरात यांच्या माध्यमातून मिळवून दिली. हे पुण्याईचे काम काँग्रेसच्या माध्यमातून केल्याने ही जागा लोकार्पण करताना विशेष आनंद आहे.कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती प्रतिमा पाटील, महापौर स्वाती यवलुजे, प्रदीप झांबरे, माजी जि. प. सदस्य शशिकांत खोत, काकासाहेब पाटील, संजय माने, राजू माने, सुभाष माने, बाबूराव हजारे, ग्रा. पं. सदस्य अजय पाटील, अलका कांबळे, मनोज मछले, जयराज भाट, संजय नवले, सावन नवले, विनोद मछले, मोहन मछले , सूरज बागडे, कृष्णा मछले, महेंद्र तमायचे, आदी उपस्थित होते.फक्त भाजपचा सातबारा भरणे सुरूबाळासाहेब थोरात हे महसूलमंत्री असताना त्यांनी आॅनलाइन सातबारा, महसूल विभागाचे क्रांतिकारक निर्णय घेतले. पण आताचे महसूलमंत्री हे फक्त भाजपचा सातबारा भरायचे काम करीत आहेत, अशी टीका पाटील यांनी केली.