शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

काॅंग्रेस पक्ष म्हणून ‘पी. एन.’ आणि आम्ही एकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सहकारी संस्थांमधील राजकारण वेगळे असते, काॅंग्रेस पक्ष म्हणून आमदार पी. एन. पाटील व आपण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : सहकारी संस्थांमधील राजकारण वेगळे असते, काॅंग्रेस पक्ष म्हणून आमदार पी. एन. पाटील व आपण एकच आहोत, असा पुनरुच्चार पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला. राहुल पाटील व जयवंतराव शिंपी ही तरुण-ज्येष्ठांची जोडी जिल्हा परिषदेमध्ये कामाचा ठसा उमटवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शासकीय विश्रामगृहात सोमवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची नावे जाहीर केली. त्यावेळी मंत्री पाटील बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले, दीड वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेमध्ये सत्तांतर करुन महाविकास आघाडीची सत्ता आणली. आता अध्यक्षपदी राहुल पाटील तर उपाध्यक्षपदी जयवंतराव शिंपी यांना संधी दिली आहे. पाटील हे तरुण आहेत, तर शिंपी हे ज्येष्ठ व परिपक्व असल्याने काम उठावदार करतील. विरोधकांनीही निवडी बिनविरोध कराव्यात.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जिल्हा परिषदेची मुदत संपायला थाेडा कालावधी राहिला आहे. या कालावधीतही तेथील कामाला गती देऊन गावे कोरोनामुक्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. यावेळी आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, भय्या माने, उदयसिंह पाटील-कौलवकर, हंबीरराव पाटील, सतीश पाटील, शंकरराव पाटील उपस्थित हाेते.

अन् ‘पी. एन.’ यांची यंत्रणा सक्रिय झाली

शासकीय विश्रामगृहात दोन्ही मंत्र्यांनी अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या नावांची घोषणा केल्यानंतर पी. एन. पाटील यांच्या गटाची यंत्रणा सक्रिय झाली. यावेळी निवड सभा, त्यानंतरचे नियोजन करण्यात पहिल्या फळीतील कार्यकर्ते गुंतले होते.

सभापतींच्या नावाची आज घोषणा

विषय समितीच्या चार सभापतींच्या निवडी आज (मंगळवारी) होत आहेत. यातील तीन सभापतीपदे ही शिवसेनेला दिली जाणार आहेत, सभापतींच्या नावांची घोषणा मंगळवारी सकाळी अकरा वाजताच होणार आहे.

युवराज पाटील यांचा योग्य सन्मान करु

राष्ट्रवादीकडून अध्यक्ष पदासाठी युवराज पाटील हे आग्रही होते. मात्र, ते काॅंग्रेसकडे गेले असले तरी त्यांचा योग्य सन्मान करु, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

म्हणून शिंपींना संधी

आजरा नगर पंचायत झाल्याने हा जिल्हा परिषदेचा मतदारसंघ रद्द झाला आहे. त्यामुळे जयवंतराव शिंपी यांची पु्न्हा सदस्य होण्याची शक्यता कमी असल्याने त्यांना संधी दिल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

दरवाढीवर टीका नको होती

‘गोकुळ’ने दूध दरवाढ केल्यानंतर विरोधी संचालकांनी त्यावर केलेल्या टीकेबाबत विचारले असता, मंत्री मुश्रीफ म्हणाले, आम्ही दीड महिन्यात शेतकऱ्यांना दोन रुपये जादा दिले, त्यामुळे असे पत्रक काढायला नको होते.

फोटो ओळी : शासकीय विश्रामगृहात सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची नावे निश्चित करण्यात आली. यावेळी नेत्यांनी विजयाची खूण दाखवली. शंकरराव पाटील, शिवाजी कवठेकर, उदयसिंह पाटील-कौलवकर, ए. वाय. पाटील, पी. एन. पाटील, जयवंतराव शिंपी, सतेज पाटील, राहुल पाटील, हसन मुश्रीफ, राजेश पाटील, हंबीरराव पाटील, आदी उपस्थित होते. (फाेटो-१२०७२०२१-कोल-झेडपी) (छाया- नसीर अत्तार)