शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सहलीवर रवाना

By admin | Updated: March 18, 2017 00:16 IST

जिल्हा परिषद : उर्वरित सदस्य आज जाणार

कोल्हापूर : जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी दोन्ही कॉँग्रेस व ‘भाजता’मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. कोणताही पक्ष सदस्यांबाबत जोखीम उचलण्यास तयार नसल्याने कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसने शुक्रवारी सायंकाळी आपले सदस्य सहलीवर पाठविले. जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी दोन्ही गटांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार आहे. शिवसेनेने अद्याप भूमिका जाहीर न केल्याने कॉँग्रेस-राष्ट्रवादी व भाजप समोर पेच निर्माण झाला आहे. तोपर्यंत आपल्या सदस्यांमध्ये फूट पडू नये, यासाठी दोन्ही कॉँग्रेसने सावधानता म्हणून सदस्य सहलीवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीच्या नूतन सदस्यांना शुक्रवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृह येथे बोलावण्यात आले. त्यानंतर नऊ सदस्यांना बेळगाव येथे पाठविण्यात आल्याचे समजते. बेळगाव येथून त्यांना गोव्याला हलविण्यात येणार आहे. युवराज पाटील व विजय बोरगे हे सदस्य सहलीवर गेलेले नाहीत. कॉँग्रेसने सायंकाळी कॉँग्रेस कमिटी सदस्यांना एकत्रित केले. त्यानंतर फुलेवाडी येथील पी. एन. पाटील यांच्या गॅरेजवर हलविण्यात आले. कॉँग्रेसच्या १४ पैकी १0 सदस्यांना कोकणात सहलीवर पाठविल्याचे समजते. जिल्हा परिषदेच्या ‘शाहू पुरस्कार’चे वितरण आज, शनिवारी असल्याने काही विद्यमान सदस्यांचा यामध्ये गौरव होणार आहे. त्यानंतर या सदस्यांना रवाना केले जाणार आहे.बोरगे अजून शाहूवाडीतच!शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचे विजय बोरगे हे शुक्रवारी सहलीवर गेलेले नाहीत, ते अजून शाहूवाडीतच आहेत. त्यांना शनिवारी किंवा रविवारी सहलीवर पाठविण्यात येणार असल्याचे समजते. हत्तरकी, खमलेट्टी कॉँग्रेससोबत?‘गोकुळ’चे दिवंगत संचालक राजकुमार हत्तरकी यांच्या पत्नी रेखा हत्तरकी व जिल्हा बॅँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील यांच्या गटाच्या राणी खमलेट्टी हे गडहिंग्लज तालुक्यातील दोन सदस्य कॉँगेससोबत राहणार असल्याचे समजते.