शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेस-राष्ट्रवादी नगरसेवकांची हायकोर्टात याचिका

By admin | Updated: May 7, 2016 01:11 IST

जात पडताळणी प्रमाणपत्र : एकतर्फी कारवाईस राज्य सरकारला मनाई करण्याची विनंती

कोल्हापूर : जात पडताळणी प्रमाणपत्र निर्धारित वेळेत न देणाऱ्या महानगरपालिका सभागृहातील कॉँग्रेसच्या सहा, राष्ट्रवादीच्या चार, तर शिवसेनेच्या एक अशा ११ नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये एकतर्फी कारवाई करण्यास राज्य सरकारला मनाई करण्याची विनंती करण्यात आली आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत आरक्षित जागेतून विजयी झालेल्या ३३ नगरसेवकांना जातीच्या दाखल्याची पडताळणी केल्याबाबतचे विभागीय जात पडताळणी समितीचे प्रमाणपत्र निवडणूकझाल्यापासून सहा महिन्यांच्या आत सादर करण्याबाबत सांगण्यात आले होते. ही निर्धारित मुदत ३० एप्रिलला संपली. या मुदतीत केवळ १३ नगरसेवकांनी जात पडताळणी प्रमाणपत्रे महापालिका प्रशासनाकडे सादर केली होती. उर्वरित २० नगरसेवकांना ती मिळाली नाहीत. त्यांच्या अर्जावर जात पडताळणी समितीने निर्णय वेळेत दिला नाही. दरम्यान, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी ज्या २० नगरसेवकांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केली नाहीत, त्यांच्याबाबतचा अहवाल राज्य सरकारच्या नगरविकास विभागास पाठवून त्यांच्याविरोधात काय कारवाई करावी, याबाबत मार्गदर्शन मागविले आहे. गुरुवारी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करून घेतली. न्या. कर्णिक व न्या. कानडे यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी होणार असल्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून सांगण्यात आले. राज्य सरकार अथवा कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही, म्हणून एकतफर् ी कारवाई केली जाऊ नये, त्याआधी आमचे म्हणणे ऐकून घेतले जावे, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. विभागीय जात पडताळणी समितीकडून अद्याप कार्यवाही पूर्ण न झाल्यामुळे प्रमाणपत्रे मिळालेली नाहीत. म्हणून आमचे म्हणणे ऐकूनच निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा याचिकेत करण्यात आली आहे. ११ नगरसेवकांच्यावतीने अ‍ॅड. अमित बोरकर काम पाहणार आहेत. (प्रतिनिधी) न्यायालयात धाव घेणाऱ्यांत महापौरांचा समावेशज्या २० नगरसेवकांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केली नाहीत, त्यामध्ये कॉँग्रेसचे सहा, राष्ट्रवादीचे चार, तर शिवसेनेचा एक नगरसेवक आहे. पक्षीय राजकारणातून नगरसेवकपद रद्द केले जाईल, या भीतीपोटी ११ नगरसेवकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, संदीप नेजदार, सुभाष बुचडे, स्वाती यवलुजे, दीपा मगदूम, रिना कांबळे, अफजल पिरजादे, हसिना फरास, सचिन पाटील, नियाजखान, आदी नगरसेवकांचा त्यात समावेश आहे.