शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीमुळेच काँग्रेसचे नुकसान

By admin | Updated: November 15, 2016 00:03 IST

अशोक चव्हाण : रहिमतपूर येथील प्रचारसभेत टीकास्त्र

रहिमतपूर : ‘काँग्रेसचे सर्वाधिक नुकसान राष्ट्रवादीबरोबरीच्या आघाडीमुळेच झाले. त्यामध्ये सर्वांत मोठा तोटा पश्चिम महाराष्ट्राला झाला. काँग्रेस पक्ष भक्कम करण्यासाठी भविष्यात स्वबळावर निवडणुका लढण्याचे निर्णय घेऊन कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला जाईल,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले.रहिमतपूर येथे सोमवारी पालिका निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचार प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे, प्रकाश पाटील, तौफिक मुलाणी, नीलेश माने, धैर्यशील कदम, अ‍ॅड. विजय कणसे, भीमराव पाटील, किरण बर्गे, किशोर बाचल, संपत माने, जाकीर पठाण, अंकुशराव भोसले उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, ‘रहिमतपूर पालिकेच्या निवडणुकीत प्रथमच काँग्रेसने पक्षीय चिन्हावर निवडणूक लढविली आहे. त्यामुळे हा विजयाचा ऐतिहासिक संदेश मंत्रालयापर्यंत जावा व पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसच्या विजयाची सुरुवात झाली आहे, हे कळू द्यात.’ यावेळी आमदार आनंदराव पाटील, धैर्यशील कदम, अजित पाटील-चिखलीकर, नीलेश माने, तौफिक मुलाणी यांची भाषणे झाली. यावेळी काँग्रेसचा निवडणूक वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. कार्यक्रमासाठी सतीश भोसले, गौतम जाधव, शंकर भोसले, विकास माळी, रावसाहेब माने, शिवाजीराव माने, दयानंद भोसले, जितेंद्र भोसले, उमेश साळुंखे, उमेश ताटे, डॉ. शंकर पवार, जनार्दन चव्हाण, बबनराव पवार उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष संपतराव माने यांनी प्रास्ताविक केले. दीपक साबळे, सय्यद यांनी सूत्रसंचालन केले. धैर्यशील सुपले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)नोटा बदलण्याने अर्थव्यवस्था खिळखिळी...‘भाजपच्या नोटा बदलण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांसह नोकरदारांची, सामान्य जनतेची अवस्था दयनीय व देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. काळा पैसा शोधायला हवा, त्याला आमचा विरोध नाही; पण देशात निर्माण झालेल्या परिस्थितीला जबाबदार कोण?,’ असा प्रश्नही अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला.बारामतीची चाकरी करणाऱ्यांकडून घराघरांत भांडणे लावण्याचे काम राष्ट्रवादी करत आहे. ज्या पक्षाचा इतिहास गद्दारीचा आहे, त्या पक्षाची सूज उतरविण्याची वेळ आली आहे. त्यासाठी मागेल ती ताकद पक्षीय पातळीवर दिली जाईल. - जयकुमार गोरे, आमदार