शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सावकरांना काँग्रेस आघाडीचा ‘बाय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:55 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीचा उमेदवारच उभा न करता जनसुराज्य पक्षाचे ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीचा उमेदवारच उभा न करता जनसुराज्य पक्षाचे संस्थापक, माजी मंत्री विनय कोरे यांच्यामागे रसद पुरविण्याच्या हालचाली आघाडीत सुरू आहेत.कोरे महायुतीत असले तरी स्थानिक राजकारणात ते आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्यासोबत राहिले आहेत. त्यात लोकसभा निवडणुकीत कोरे यांनी ‘हातकणंगले’मध्ये भूमिका जाहीर न करता मदत केल्याने त्यांचा पैरा फेडण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी आग्रही आहेत. त्यामुळे काँग्रेस ५, राष्टÑवादी ३ व स्वाभिमानीने १ जागेवर लढावे, अशी प्राथमिक चर्चा झाली आहे. मात्र, ‘स्वाभिमानी’ने ‘हातकणंगले’वर दावा सांगितल्याने काँग्रेसपुढे पेच निर्माण झाला आहे.विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेसचे राज्याचे जागावाटप निश्चित झाले आहे. दोन्ही काँग्रेस प्रत्येकी १२५ जागा लढणार असून, उर्वरित ३८ जागा मित्रपक्षांना देणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील दहा जागांचे वाटपही बऱ्यापैकी पूर्ण झाले असून ‘कोल्हापूर उत्तर’, ‘कोल्हापूर दक्षिण’, ‘करवीर’, ‘हातकणंगले’, ‘इचलकरंजी’ या जागा काँग्रेसला मिळणार आहेत. ‘कागल’, ‘चंदगड’, ‘राधानगरी-भुदरगड’ या राष्टÑवादीला, तर ‘शिरोळ’ स्वाभिमानी पक्षाला सोडण्यात येणार आहेत. ‘शाहूवाडी’तून काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे सभापती अमरसिंह पाटील यांनी मागणी केली आहे; पण जिल्हा बँक, गोकुळ, बाजार समितीसह स्थानिक राजकारणात माजी मंत्री विनय कोरे हे दोन्ही काँग्रेससोबत राहिले आहेत. अटीतटीच्या विधानपरिषद निवडणुकीत कोरे यांनी आमदार सतेज पाटील यांच्या मागे ताकद लावली होती, तर मावसभाऊ आमदार सत्यजित पाटील हे महादेवराव महाडिक यांच्यासोबत राहिल्याचा राग आमदार पाटील यांच्या मनात आहे. स्थानिक राजकारणात त्यांची महाडिक विरोधातच भूमिका असल्याने आमदार मुश्रीफ व आमदार पाटील यांचे पाठबळ राहणार आहे. त्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीत असतानाही कोरे यांनी ‘हातकणंगले’मध्ये आपली भूमिका जाहीर केली नव्हती; पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणाला मदत केली, हे जगजाहीर आहे. त्यामुळेच लोकसभेचा पैरा फेडण्यासाठी राजू शेट्टी दोन्ही काँग्रेसशी सहमती दर्शवतील, अशी चर्चा आहे.‘स्वाभिमानी’ने हातकणंगलेवर दावा सांगितला आहे; पण येथून काँग्रेसतर्फे राजू जयवंतराव आवळे हे इच्छुक आहेत. त्यांनी लढण्याची पूर्ण तयारी केल्याने आघाडीसमोर पेच निर्माण झाला आहे. राजू शेट्टी हे मराठवाड्याच्या दौºयावर आहेत, ते शुक्रवारी (दि. २०) कोल्हापुरात येत आहेत. त्यानंतरच ‘हातकणंगले’चा पेच सुटणार आहे.