लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शेतकरी संप मागे घेताना, मंत्रिगटाचे प्रमुख तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिगटाच्या निर्णयाला बांधिल का नाहीत? मंत्रिगटाने घेतलेला निर्णय मुख्यमंत्र्यांना मान्य नाही आणि मुख्यमंत्र्यांची अपेक्षा मंत्रिगटाला माहिती नसल्याने, राज्य मंत्रिमंडळात उघडपणे दोन गट पडले, अशी घणाघाती टीका कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केली. प्रामाणिक परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान द्या, यासह विविध मागण्यांसाठी कॉँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्या वेळी आ. पाटील बोलत होते.
कोल्हापुरात काँग्रेसचा मोर्चा
By admin | Updated: July 6, 2017 04:26 IST