शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेस आघाडीत ‘एमआयएम’ नसेल: पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 23:47 IST

कोल्हापूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस, स्वाभिमानी, भारिप, शेकाप, जनता दलासह दहा पक्षांची ...

कोल्हापूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस, स्वाभिमानी, भारिप, शेकाप, जनता दलासह दहा पक्षांची महाआघाडी आकारास येत आहे. त्यानुसार रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर हे काँग्रेस आघाडीचे घटक असतील. त्यांनी कुणाशी आघाडी करावी, हा त्यांचा प्रश्न असून, काँग्रेसच्या व्यासपीठावर मात्र ‘एमआयएम’ला स्थान नसेल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.पृथ्वीराज चव्हाण हे बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. कॉँग्रेस कमिटीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी चव्हाण म्हणाले, केंद्र व राज्य सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले असून, ते पाच वर्षांची कारकिर्द पूर्ण करील, अशी सध्या तरी परिस्थिती नाही.नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यस्था कोलमडली आहे. अर्थव्यवस्था २.५ टक्क्यांनी घसरल्याने चार लाख कोटींनी देशाच्या उत्पन्नात घट झाली, याला नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत. रिझर्व्ह बॅँकेच्या संचालक मंडळाची सोमवारी (दि. १९) बैठक आहे. यामध्ये मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे.‘राफेल’मध्ये तर मोदींनी देशाची फसवणूक केली असून, ६७० कोटींचे विमान १६७० कोटींना कसे खरेदी केले? हा भ्रष्टाचार नव्हे काय? भाजपचे सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे धार्मिक दुहीचा वापर करणार असून राममंदिर, खरे-खोटे हल्ले करणे, शहरांची नावे बदलणे, आदी उद्योग सुरू आहेत; पण एकाच मुद्द्यावर एकदाच यश मिळते. मराठा आरक्षणाबाबत सरकार वेळकाढूपणा करीत असून, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची वाट पाहत असल्याचे सांगत चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणुकीत देशात सत्तांतर होणार आहे.सरकार-रिझर्व्ह बॅँकेत संघर्षनोटाबंदीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी रिझर्व्ह बॅँकेच्या संचालक मंडळालाही विश्वासात घेतले नाही. अतिशय गुप्त असणारा संचालक मंडळाच्या सभेचा कार्यवृत्तांतही बाहेर आला. रिझर्व्ह बॅँकेकडून केंद्र सरकारने कायदा कलम ७ नुसार हजारो कोटींची गंगाजळी मागितली आहे. रिझर्व्ह बॅँकेची स्वायत्तता धोक्यात आल्याने सरकार व रिझर्व्ह बॅँकेत संघर्ष सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.