शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाची धुरा पुन्हा ‘पी. एन.’ यांच्याकडेच

By admin | Updated: April 17, 2016 00:33 IST

अशोक चव्हाण यांचे पत्र : २00६ पासून चौथ्यांदा मुदतवाढ

कोल्हापूर : राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा पुन्हा माजी आमदार पी. एन. पाटील यांच्यावरच सोपविली. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी तसे पत्र पाटील यांना दिले असून २००६ पासून चौथ्यांदा त्यांना ‘प्रभारी’ म्हणून मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात प्रदेश कार्यकारिणीसह काही जिल्हाध्यक्षांच्या निवडी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जाहीर केल्या. त्यामध्ये कोल्हापूर शहर व जिल्हाध्यक्षपदाचा निर्णय प्रलंबित ठेवला. जिल्हा व शहराध्यक्ष पदावर कुणाची वर्णी लावावी, त्यासाठी प्रदेशाध्यक्षांनी दि. २१ मार्चला मुंबईत पदाधिकाऱ्यांची मते आजमावली. त्यात इचलकरंजी येथील शिष्टमंडळाने माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यासाठी तर भरमूअण्णा पाटील, जयवंतराव आवळे, जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील, अ‍ॅड. सुरेश कुराडे, बजरंग देसाई, अभिजित तायशेटे आदींनी पी. एन. पाटील यांच्यासाठी आग्रह धरुन त्यांना जिल्हाध्यक्षपदी कायम ठेवले तरच जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता येईल, असे सांगितले. प्रदेश कार्यकारिणीमध्ये पी. एन. पाटील यांना सरचिटणीसपदाची जबाबदारी दिल्याने त्यांना जिल्हाध्यक्षपदावरून बाजूला केले जाणार, अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. कार्यकारिणी निवडीनंतर काँग्रेसमध्ये कमालीची अस्वस्थता पसरल्याची दखल घेऊन श्रेष्ठींनी पी. एन. पाटील हेच प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत राहतील, असे पत्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या मान्यतेने सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांनी काँग्रेस कमिटीत पाठविले. जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंत कायम राहणार? जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष बदलण्याची शक्यता फारच धूसर आहे. त्यामुळे पाटील व शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांना किमान जिल्हा परिषद निवडणुकांपर्यंत पदावर कायम ठेवण्याची शक्यता आहे. महाडिक यांच्याशी चर्चा करणार मालोजीराजे पक्षात पुन्हा आल्याने आमची ताकद वाढली आहे, महादेवराव महाडिक यांच्यासह पक्षावर व माझ्यावर जे कोणी रूसले आहेत, त्यांच्याशी चर्चा करून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या मान्यतेने त्यांना पक्षात घेऊन पक्ष बळकट करू, असेही पी. एन. पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)