इचलकरंजी : शेतकऱ्यांच्या विरोधातील तीन काळे कायदे केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी देशव्यापी संप पुकारण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर येथील काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत धरणे आंदोलन करण्यात आले.
शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करा, चले जाव-चले जाव भाजप सरकार चले जाव... अशा विविध घोषणा देण्यात आल्या. यावेळी काँग्रेस समितीसमोर गॅस सिलिंडर, पेट्रोल दरवाढ, ऊस, ज्वारी... असे विविध फलक लावून केंद्र सरकारचा निषेध केला.
आंदोलनात अध्यक्ष संजय कांबळे, नगरसेवक राहुल खंजिरे, शशांक बावचकर, बाबासाहेब कोतवाल, अजित मिणेकर, युवराज शिंगाडे, मुन्ना खलिफा, प्रमोद मुसळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
फोटो ओळी
२६०३२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजीत काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत धरणे आंदोलन करण्यात आले.
छाया - उत्तम पाटील