शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा आवाज बंद करण्याचे काँग्रेसचे षड्‌यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:14 IST

कोल्हापूर : फिरंगाई प्रभाग क्रमांक ४७ मधील ६५० मते दुसऱ्या प्रभागात घुसवली असून दक्षिण मतदार संघातील मते इकडे नोंद ...

कोल्हापूर : फिरंगाई प्रभाग क्रमांक ४७ मधील ६५० मते दुसऱ्या प्रभागात घुसवली असून दक्षिण मतदार संघातील मते इकडे नोंद केली आहेत. शिवसेनेचा आवाज बंद करण्याचे षड्‌यंत्र सत्तेत असणारी काँग्रेस करत आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार पराभूत करण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत केला.

शिवसेनेकडून करण्यात येणारी विकासकामे, तगड्या उमेदवारांचा पक्षातून उमेदवारी मागणीचा वाढता कल, मंत्र्यांवर यापूर्वी केलेला आरोप यामुळेच काँग्रेसकडून अशा प्रकारचे राजकारण सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

इंगवले म्हणाले, महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीतील गैरकारभार समोर आला आहे. यामध्ये फिरंगाईमधील मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाला आहे. ६५० पेक्षा जास्त हक्काची मते तटाकडील तालीम प्रभाग क्रमांक ४८ मध्ये गेली आहेत. तसेच फिरंगाई प्रभागात मिराबाग, दुधाळी, लक्षतीर्थ वसाहत, रंकाळा, शाहू कॉलनी, वेताळ तालीम, खंडोबा तालीम येथील मतदारांचा समावेश केला आहे. असाच प्रकार सर्वच प्रभागात झाला आहे. ताबडतोब पूर्वीप्रमाणे मतदार यादी करावी, अन्यथा महापालिकेचे कामकाज बंद पाडू, तीव्र आंदोलन करू.

पत्रकार परिषदेला आबा जगदाळे, राजू घोरपडे, तात्या साळोखे, सुकुमार लाड, जीवन घोरपडे आदी उपस्थित होते.

चौकट

कोणत्या मंत्र्याच्या सांगण्यावरून घोळ

फिरंगाई प्रभागात १२०० पेक्षा जास्त मतांचा घोळ झाला आहे. महापालिकेतील अधिकाऱ्यांनी कोणत्या मंत्र्याच्या सांगण्यावरून हे षड्‌यंत्र केले याचा खुलासा केला पाहिजे, अशी मागणीही इंगवले यांनी केली. मंत्र्यानेही संबंधित अधिकाऱ्यांना पूर्वीप्रमाणे यादी करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा इंगवले यांनी दिला.