शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

‘दुटप्पीं’ना दूर केल्याने काँग्रेसला यश

By admin | Updated: November 5, 2015 00:11 IST

पतंगराव कदम यांचा टोला : महानगरपालिका विजयामुळे काँग्रेसला नवसंजीवनी

कोल्हापूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील सलग पराभवामुळे खचलेल्या काँग्रेसला महापालिकेच्या विजयामुळे नवसंजीवनी मिळाली. त्याचा भविष्यातील राजकारणासाठी नक्कीच लाभ होईल, असे गौरवोद्गार माजी मंत्री व काँग्रेस पक्षाचे निरीक्षक पतंगराव कदम यांनी काँग्रेस समिती कार्यालयात झालेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार समारंभात काढले. या निवडणुकीत ‘आत एक आणि बाहेर दुसरेच’ करणाऱ्या प्रवृत्तीला पक्षाने दूर ठेवल्यामुळेच हे यश मिळाले, अशी खोचक टिपण्णी कदम यांनी आमदार महादेवराव महाडिक यांचे नाव न घेता केली. महापालिका निवडणुकीतील काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा मंगळवारी काँग्रेस कार्यालयात कदम यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी ते बोलत होते.कदम म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्रात जे घडते ते राज्यात घडते आणि जे राज्यात घडते ते संपूर्ण देशात घडते म्हणून भविष्यातील काँग्रेसच्या राजकारणाला नवीन गती, संजीवनी देण्याचे काम कोल्हापूरच्या जनतेने केले. दररोज आढावा घेत गेलो. तिकीट वाटपसुद्धा सर्व संमतीने झाले म्हणूनच पक्षाला मोठे यश मिळाले. आपल्या पक्षात आपल्याच माणसांना पराभूत करणारी प्रवृत्ती असून हीच काँग्रेसची खरी गंमत आहे; परंतु यंदाच्या मनपा निवडणुकीत अशा प्रवृत्तींना बाजूला ठेवले. ज्यांनी ज्यांनी विरोधात काम केले, त्यांची नावे व घटना लेखी कळवा, संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.’मनपा निवडणुकीत काँग्रेसला २३ टक्के मते मिळाली आहेत. ‘अच्छे दिन’च्या भूलथापांतून जनता बाहेर आल्यामुळे काँग्रेसला चांगले यश मिळाले. हे यश एकट्या सतेज पाटील यांचे नाही तर संयुक्तिक आहे, असे सांगत सतेज पाटील यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. आता तो टिकविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले. प्रत्येक सहा महिन्यांनी प्रभागात ‘जनता दरबार’ घेऊन कामांचा आढावा घेतला जाईल आणि त्यास मी स्वत: उपस्थित राहीन, असेही कदम यांनी सांगितले. काँग्रेसमधून काही जणांना फोडण्याचा प्रयत्न झाला, पक्षात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कॉँग्रेस जनतेचा अजेंडा घेऊन मतदारांच्या दारात गेला. प्रदेश कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी दिशा दिली म्हणूनच हे यश मिळाले, असे सतेज पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, जयवंतराव आवळे यांची भाषणे झाली. शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी स्वागत केले. सरलाताई पाटील यांनी आभार मानले. समारंभास सुरेश कुराडे, ऋतुराज पाटील, संध्या घोटणे, प्रकाश सातपुते आदी उपस्थित होते.