शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा दावा २५२ मतदारांचा

By admin | Updated: December 27, 2015 01:26 IST

पुण्यात बैठक : नेत्यांची मतदारांशी चर्चा; आज थेट मतदान केंद्रावरच येणार

कोल्हापूर : विधान परिषदेच्या निवडणुकीत आपल्याकडे या घडीला ३८२ पैकी २५२ मते असल्याचा दावा काँग्रेस, राष्ट्रवादी व जनसुराज्य पक्षाच्यावतीने करण्यात आला. पुण्यातील डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलात झालेल्या मतदारांच्या बैठकीस २४७ मतदार उपस्थित होते. उर्वरित पाच सदस्य आजारपणामुळे या बैठकीस उपस्थित राहू शकले नसल्याचे सांगण्यात आले. या बैठकीत नेत्यांनी काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले. हे सर्व मतदार आज रविवार पुण्याहून थेट त्या त्या मतदान केंद्रावर येणार आहेत. आज रविवारी बारा मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया होत आहे. दरम्यान, विरोधी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार आमदार महादेवराव महाडिक यांनी त्यांच्या मतदारांना येलूर व कराडमधील हॉटेलमध्ये ठेवले असून त्यांनाही आजच रविवारी थेट मतदानासाठी आणण्यात येणार आहे. महाडिक यांच्याकडूनही चमत्काराचा दावा करण्यात आला असून, काही झाले तरी विजय आमचाच असेल, असे त्यांचेही कार्यकर्ते ठासून सांगत आहेत. काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांचे समर्थक मतदार पुण्यातील तीन आलिशान हॉटेलमध्ये मुक्कामास आहेत. शनिवारी दुपारी झालेल्या बैठकीस सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार निवेदिता माने यांच्यासह शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी कोणताही दगाफटका न करता पक्षाशी प्रामाणिक राहून सतेज पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले. या बैठकीस नगरसेवक भूपाल शेटे, विक्रांत माने, मलकापूरचे गोसावी व आवाडे यांचे दोन मतदार रुग्णालयात दाखल असल्यामुळे या बैठकीस उपस्थित राहू शकले नसल्याचे सांगण्यात आले. विधान परिषदेसाठी आज मतदान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची लढत अजून लांब असली तरी कोल्हापूरच्या राजकारणातील बंदा कोण हे ठरविणारी कोल्हापूर केसरीची लढत आज रविवारी होत आहे. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी आज, रविवारी जिल्ह्यातील बारा केंद्रांवर सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार आहे. (प्रतिनिधी)