शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-भाजपमध्ये लढत

By admin | Updated: October 25, 2016 01:13 IST

इचलकरंजी नगरपालिका : मित्रगट-आघाड्यांशी जागा वाटपाबाबत कोंडी

इचलकरंजी : नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय कॉँग्रेस व भाजप यांच्यातच लढत होणार असली तरी त्यांच्याशी समझोता करणारे अन्य पक्ष व आघाड्यांच्या जागा वाटपांमध्ये कमालीची कोंडी निर्माण झाली आहे. सोमवारी रात्री कॉँग्रेस व राष्ट्रवादी आणि ‘शविआ’ व मॅँचेस्टर आघाडी यांच्यातील रात्री उशिरापर्यंत जागा वाटपाच्या वाटाघाटी सुरू होत्या.नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील कारंडे व जांभळे हे दोन्ही गट एकत्रित येऊन निवडणुकीला सामोरे जाण्यावर एकमत झाले आहे. इचलकरंजी नगरपालिकेच्या ६२ जागांपैकी कॉँग्रेस ४० आणि राष्ट्रवादीतील दोन्ही गटाला २० ते २२ जागा असा सर्वसाधारण फॉर्म्युला ठरला आहे; पण कॉँग्रेस पक्षाकडे असलेले इच्छुक आणि राष्ट्रवादीतील दोन्ही गटांकडून होणारी मागणी, यामध्ये काही प्रभागात अडचणी येऊ लागल्या आहेत. अशा अडचणींची सोडवणूक करण्यासाठी कॉँग्रेस व राष्ट्रवादीतील कारंडे गट यांच्यातील प्रमुखांची रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. या बैठकीला माजी मंत्री प्रकाश आवाडे, कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश मोरे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मदन कारंडे, शहर अध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव विठ्ठल चोपडे, स्वप्निल आवाडे, कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील, माजी नगराध्यक्ष अशोकराव औरगे, आदी उपस्थित होते.सोमवारी दुपारी कॉँग्रेस व राष्ट्रवादीतील जांभळे गट यांची बैठक झाली. सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी सुमारे बारा जागांचा आग्रह धरला असल्याचे समजते. त्यांच्याकडील प्राधान्यक्रमाने प्रभागांबाबत चर्चा झाली. सायंकाळी कारंडे गटाबरोबर बैठक घेऊन आज, मंगळवारी पुन्हा जांभळे यांच्याबरोबर वाटाघाटी करण्याच ठरले आणि ही बैठक सायंकाळी साडेपाच वाजता संपली.इकडे भाजप आणि शहर विकास आघाडी यांच्यात ३१ अशा जागा वाटपाचा फॉर्म्युला मागील आठवड्यात ठरल्याची घोषणा आमदार सुरेश हाळवणकर यांनी केली होती. त्यानंतर मॅँचेस्टर आघाडीने ‘शविआ’शी समझोता केला. मॅँचेस्टर आघाडीनेही सुमारे १२ जागा मागितल्या आहेत. भाजप, ‘शविआ’ व मॅँचेस्टर आघाडी यांच्यामध्ये काही इच्छुकांनी समान प्रभागांची मागणी केल्याने तेथेही अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यांच्यात चर्चेच्या दोन-तीन फेऱ्या झाल्या, तरी सन्मानीय तोडगा निघत नसल्याने जागा वाटप लांबणीवर पडत आहे. निवडणूक कॉँग्रेस विरुद्ध भाजप अशी दिसत असली तरी समझोता करणारे पक्ष-गट-आघाड्यांतील जागा वाटपाची गोची निर्माण झाली आहे. अशा स्थितीत दोन्ही बाजूलाही इच्छुक असलेल्यांना उमेदवारी मिळाली नाही, तर मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होणार, असे चित्र असल्याने बंडखोरी टाळण्यासाठी गुरुवारपर्यंत बोलणी लांबण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे आॅफरशहर विकास आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे समझोता करण्याची आणि त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची आॅफर दिली असल्याचे सांगण्यात आले. त्यासंदर्भात आज, मंगळवारी सकाळी ‘शविआ’, भाजप व ‘स्वाभिमानी’चे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी यांची बैठक होणार असून, यामध्ये होणाऱ्या निर्णयाची उत्सुकता लागून राहिली आहे.