केंद्र सरकारने केलेल्या पेट्रॉल, डिझेल दरवाढी विरोधात हातकणंगले तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी सकाळी ११ वा. आ. राजू बाबा आवळे यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले येथील पेट्रोल पंपावर आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढ करून सर्वसामान्य जनतेला मेटाकुटीला आणले आहे. याचा निषेध करत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून सोमवारी पेट्रोल, डिझेल व गॅसदरवाढ विरोधात महाराष्ट्र राज्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एकाच वेळी सकाळी ११ वाजता हातकणंगले पेट्रोल पंपावर केंद्र सरकारचा निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले.
यावेळी भगवान जाधव, बबनराव पाटील, बाजीराव पाटील, नगराध्यक्ष अरुण जानवेकर, बाजीराव सातपूते, एस.एन. पाटील, शकील अत्तार, गिरीश इंगवले, उत्तम पाटील,डॉ. विजय गोरड, सदानंद महापुरे, पिंटू किणींगे, राजू कचरे, देवाप्पा कांबळे उपस्थित होते.
फोटो ओळी - हातकणंगले येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ विरोधात आंदोलन करते वेळी आ. राजूबाबा आवळे, नगराध्यक्ष अरुण जानवेकर, भगवान जाधव, बाजीराव सातपूते, एस.एन. पाटील, शकील अत्तार, गिरीश इंगवले उपस्थित होते.