शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

गणेशाची सेवा करणारी कोल्हापूरची मंडळी

By admin | Updated: September 1, 2015 00:11 IST

१८ वर्षे सलग सेवा : कोल्हापूर-गणपतीपुळे मार्गावर गाडीतील बिघाड दूर करण्यास तत्पर

कोल्हापूर : एखाद्या आडमार्गावर दुचाकी, चारचाकी बंद पडली, पंक्चर झाली, तर त्या ठिकाणी काही सेवा उपलब्ध नसल्यास किती मोठी अडचण निर्माण होते. त्याचा विचारही न केलेलाच बरा, त्यात अशावेळी एखाद्या गु्रपने मदतीचा हात दिल्यानंतर किती हायसे वाटते, अशी मदत कोल्हापुरातून गणपतीपुळे येथे अंगारकी संकष्टीसाठी जाणाऱ्यांना वाहनधारकांना तेही एकही पैशाची अपेक्षा न ठेवता मोफत सेवा देणाऱ्या अमोल सरनाईक यांच्या गु्रपची गणेश सेवा काही औरच म्हणावी लागेल.१९९६ मध्ये कोल्हापुरातील अमोल सरनाईक हे आपल्या मित्रांसह गणपतीपुळे (रत्नागिरी) येथे अंगारकी संकष्टीला गणेश दर्शनासाठी निघाले होते. जातानाच त्यांची दुचाकी साखरपा ते पालीदरम्यान पंक्चर झाली. यावेळी त्यांनी जाणा-येणाऱ्या वाहनधारकांकडे मदत मागितली, पण कोणीच मदतीचा हात दिला नाही. बिघाड झालेली गाडी त्यांनी ओढत पाली येथे नेली तेथून त्यांनी ती दुरुस्त करून पुढे गणपतीपुळे गाठले व दर्शन घेतले. ही बाब त्यांच्या मनात घर करून बसली. त्यांनी कोल्हापुरात आल्यानंतर त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या मंडळींना आपण अंगारकी संकष्टीला कोल्हापूर ते गणपतीपुळे या मार्गावर कोणाची गाडी बंद पडली अथवा पंक्चर झाली, तर केवळ स्पेअर पार्टचे पैसे घेऊन ती तत्काळ दुरुस्त करून द्यायची, अशी संकल्पना मांडली. त्यानंतर १९९७ मध्ये आलेल्या अंगारकी संकष्टीला त्यांनी या संकल्पनेला प्रत्यक्ष उतरवलेही. पहिल्या वर्षी त्यात काही मोजकीच मंडळी सहभागी झाली. पुढे त्यांचे मित्र उदय चव्हाण, संदीप रसाळे, अमित नलवडे, अभिजित नारे, राजू मुजावर, शंकर केंगार, सचिन भोसले, अभिजित लोहार, उल्हास पाटील, कुणाल भोसले, रमेश बावले, विनायक पाटील, विशाल खटांगळे यांनीही साथ दिली. यंदा तर या मोफत सेवेला १८ वर्षे पूर्ण झाली. आज, मंगळवारी कोल्हापूर ते गणपतीपुळे या मार्गावर कोल्हापूरच्या मंडळींनी दोन मोफत केंद्रे स्थापन केली आहेत. त्यात चाफे गावाजवळ, तर दुसरे केंद्र गणपतीपुळे संस्थानजवळील आपत्ती व्यवस्थापन कक्षाजवळ उभारण्यात आले आहे. या सेवा केंद्राद्वारे दुचाकी, चारचाकी दुरुस्ती , पंक्चर काढणे, बंद पडल्यास टोचण लावून या केंद्रांपर्यंत आणून दुरुस्त करून देणे ही सेवा केली जाते. ‘लोकमत’शी बोलताना अमोल सरनाईक म्हणाले, आपल्या वाट्याला आलेले दु:ख दुसऱ्यांच्या वाट्याला येऊ नये. देवदर्शनासाठी जाताना व तेथून सुरक्षित आपल्या घरी पोहोचावीत, अशी मनात भावना ठेवून आपण मित्रमंडळींसमवेत हे काम मोफत करतो. केवळ त्यात दुरुस्तीसाठी लागणाऱ्या स्पेअरची किंमत घेतली जाते. भाविकांच्या सेवा अर्थात ईश्वर सेवाच मानून आम्ही हे काम करतो.