शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढीसाठी गावांची मनधरणी करणार

By admin | Updated: May 26, 2015 01:07 IST

शनिवारी पालिकेत कार्यशाळा : हद्दवाढीसाठी प्रशासनाचे युद्धस्तरावर प्रयत्न

कोल्हापूर : राज्य शासनास हद्दवाढीचा नव्याने प्रस्ताव पाठविण्याची तयारी आयुक्त पी. शिवशंकर यांनी केली आहे. प्रस्तावित २० गावांतील सरपंचांसह राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांची कार्यशाळा शनिवारी (दि. ३०) महापालिकेत घेण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सोमवारी ‘लोकमत’ला सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरची हद्दवाढ करण्यास उत्सुक असल्याचे संकेत रविवारी कोल्हापूर दौऱ्या दरम्यान दिले होते.कोल्हापूरच्या हद्दवाढीस राजकीय विरोध होत असल्याने हद्दवाढीचा प्रस्ताव नाकारण्यात येत असल्याचे पत्र नगरविकास मंत्रालयाने महापालिकेस पाठविले. कोल्हापूरच्या हद्दवाढीचा प्रश्न शासनस्तरावर निकाली निघाल्याची तीव्र व संतप्त प्रतिक्रिया शहरवासीयांतून उमठली. दरम्यान, आयुक्त पी. शिवशंकर यांनी शहरालगतच्या एक ते पाच किलोमीटर परिघामध्ये असणाऱ्या गावांच्या हद्दवाढीचा समावेश करण्यासंदर्भात चाचपणी सुरू केली. दरम्यान, आॅक्टोबर महिन्यांत होणारी महापालिकेची निवडणूक ‘कॅश’ करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा हद्दवाढीचे गाजर शहरवासीयांसमोर ठेवले आहे. भाजप कार्यकारिणीच्या बैठकीसाठी कोल्हापुरात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढीचा प्रस्ताव आल्यास तत्काळ मंजूरी देऊ, असे आश्वासन दिले. त्यामुळे मनपा प्रशासन पुन्हा जोमाने कामास लागले आहे.गेली तीस वर्षे रखडलेली कोल्हापूरची हद्दवाढ होणार किंवा नाही, झाल्यास किती गावे समाविष्ट होणार, संभाव्य गावांची समजूत कशी काढणार,असे अनेक प्रश्न शहरवासीयांत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनास हद्दवाढीचा पुनर्प्रस्ताव सादर करण्याची तयारी मनपा प्रशासनाने सुरू केली आहे. ३० मे रोजी नव्याने प्रस्तावित २० गावांतील ग्रामपंचायत सदस्यांसह प्रमुख नागरिकांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. त्यामध्ये हद्दवाढीचे फायदे समजावून सांगणार असल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्पष्ट केले.राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळेच हद्दवाढीला पुन्हा ‘खो’ बसला. शहरालगतच्या गावांना महानगरपालिकेच्या सोईसुविधा पाहिजेत; परंतु शहरात यायला त्यांचा विरोध आहे. केंद्र शासनाची प्रस्तावित ‘स्मार्ट सिटी’ या संकल्पनेत कोल्हापूरची निवड करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. स्मार्ट सिटीसाठी आवश्यक निकष अद्याप जाहीर झालेले नाहीत. मात्र, लोकंसख्या हा महत्त्वाचा घटक असणार आहे. यासाठी स्मार्ट सिटीसह संभावित हद्दवाढीचे शहरासह या गावांना होणारे फायदे समजावून सांगण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करणार आहे. प्रस्तावित २० गावांची ३० मे रोजी कार्यशाळा घेऊन संभाव्य गावांत हद्दवाढीबाबत असणारे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. कार्यशाळेद्वारे हद्दवाढीमुळे होणारे फायदे समजावून सांगू. जून महिन्यात होणाऱ्या महासभेच्या मंजुरीसाठी हद्दवाढीचा प्रस्ताव ठेवला जाईल. यानंतर प्रस्ताव शासनास सादर होईल.- पी. शिवशंकर मनपा आयुक्त