शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालय आवारात प्रवेश न दिल्याने वकील, पक्षकारांचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मंगळवारी सकाळी वकील व पक्षकारांनाच जिल्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मंगळवारी सकाळी वकील व पक्षकारांनाच जिल्हा न्यायालयाच्या आवारात प्रतिबंध केल्याने प्रवेशद्वारावरच काही काळ गोंधळ माजला. सुमारे दीड तास प्रवेशद्वारावर मोठी गर्दी झाली होती, आवाराबाहेर वकिलांच्या वाहनांच्या रांगा लागल्याने चौकात वाहतुकीची कोंडी झाली होती. अखेर साडेबाराला वकिलांची थर्मल तपासणी करत न्यायालयाच्या आवारात टप्प्याटप्प्याने प्रवेश देण्यात आला. आज, बुधवारपासून जिल्हा व सत्र न्यायालय आणि त्यांच्या आधिपत्याखालील सर्व तालुका न्यायालयात फक्त तातडीची व रिमांड प्रकारणाचे कामकाज चालणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व न्यायालयीन कामकाज आज, बुधवारपासून पुढील आदेश येईपर्यंत सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत तसेच दुपारी १.३० ते ३.३० या कालावधीत दोन सत्रांतच चालणार असल्याचे जाहीर केले. या दोन सत्रांत फक्त तातडीची प्रकरणे तसेच रिमांड प्रकरणाची कामे चालणार आहेत. दरम्यान, कार्यालयीन वेळही सकाळी १०.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत राहणार आहे. न्यायालयात प्रत्येक दिवशी ५० टक्के कर्मचारी उपस्थित ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांनी काढले. न्यायालयातील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी तातडीची प्रकरणे वगळून अन्य प्रकरणात पुढील तारखा देण्यात येत आहेत. शनिवारी कामकाज बंद राहणार आहे. कॅन्टीन बंद ठेवले आहे.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी ११ वाजता वकील, पक्षकार यांना न्यायालयाच्या मुख्य प्रवेद्वारावरच आडवले. त्यामुळे प्रवेशद्वारावरच मोठी मर्दी झाली. बाहेर रस्त्यावर वकिलांच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे प्रवेशद्वारावरच काही काळ गोंधळ माजला होता. दुपारी साडेबारा वाजता प्रत्येक वकिलाच्या कामकाजाबाबत खात्री करूनच त्यांना सॅनिटायझर करूनच न्यायालय आवारात प्रवेश देण्यात आला. पक्षकारांना मात्र प्रवेश नाकारला. उच्च न्यायालयाने पाठवलेल्या नियमावलींचे आज, बुधवारपासून काटेकोर अंमलबजावणी करणार असल्याची माहिती महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे सदस्य ॲड. विवेक घाटगे व जिल्हा बार असो.चे अध्यक्ष रणजीत गावडे यांनी पत्रकारांना दिली.

बार रूम सुरू, पण सोशल डिस्टन्स

न्यायालयीन कामकाज प्रक्रियेत बदल केला असला तरीही जिल्हा बार असोसिएशनच्या रूममध्ये वकिलांना बसण्यासाठी दोन खुर्च्यांमध्ये अंतर ठेवून कामकाज चालू राहणार असल्याचे ॲड. रणजीत गावडे यांनी सांगितले.