शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सोईच्या राजकारणाने कार्यकर्ते संभ्रमावस्थेत

By admin | Updated: May 6, 2016 01:11 IST

उत्तूर-मडिलगे गट : काँगे्रस, राष्ट्रवादी व शिवसेनेतील नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे पक्षनिष्ठेला तडा; मनधरणीसाठी नेत्यांचे प्रयत्न

रवींद्र येसादे --उत्तूर --आजरा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत नेत्यांच्या सोईच्या राजकारणामुळे काँगे्रस, राष्ट्रवादी व शिवसेनेतील नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत असल्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पं. समिती निवडणुकांत जबर फटका राजकीय पक्षांना बसणार आहे. कार्यकर्त्यांची उत्तूर-मडिलगे गटात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.उत्तूर-मडिलगे गटातून अशोक चराटी यांच्या महाआघाडीने उमेदवारी जाहीर करून कार्यकर्त्यांना बुचकळ्यात टाकले आहे. राष्ट्रवादीचे कारखान्याचे संचालक मारुती घोरपडे यांनी महाआघाडीतून उमेदवारी घेतली आहे. आमदार मुश्रीफ यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली होती; मात्र आमदारांकडून प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे उमेदवारी घेतली. मात्र, त्यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीच्या गोटात चलबिचल निर्माण झाली असून, तीच अवस्था मडिलगे येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते के. व्ही. येसणे यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी महाआघाडीची उमेदवारी घेतली.येसणे हे चराटी यांच्याबरोबर, तर शिंपी यांच्या गटातून राष्ट्रवादी, काँगे्रस आघाडीतून उपसभापती दीपक देसाई, माजी सभापती भिकाजी गुरव, माजी संचालक जाधव हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादी काँगे्रस आघाडीकडून उमेदवारांचे नाव गुलदस्त्यात ठेवले आहे.उत्तूर गटातून महाआघाडीतून विश्वनाथ करंबळी, महिला गटातून नर्मदा सावेकर यांची नावे जाहीर झाल्याने प्रचार सुरू केला आहे. रवींद्र आपटे यांच्या मार्गदर्शनातून कारभार सुरू आहे. राष्ट्रवादी व काँगे्रसमधून वसंतराव धुरे यांचे नाव निश्चित आहे. उर्वरित जागेसाठी जि. प. सदस्य उमेश आपटे, त्यांच्या पत्नी वैशाली आपटे, जि. प. माजी सदस्य काशीनाथ तेली यापैकी दोघांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत आमदार मुश्रीफ यांनी तेली यांना शब्द दिला होता म्हणे? अशी चर्चा कार्यकर्त्यांत आहे.ही निवडणूक पक्षनिष्ठेला तडा जाणारी आहे. याचे पडसाद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर होणार आहेत. गतवेळच्या पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न महाआघाडीतील विश्वनाथ करंबळी यांच्याकडून केला जाणार आहे. मागील जि. प. निवडणुकीत राष्ट्रवादीच्या काही मंडळींनी उमेश आपटे यांना मदत केली होती. तीच पुनरावृत्ती करण्याच्या दृष्टीने महाआघाडी प्रयत्न करणार आहे; मात्र उमेश आपटे यांनाच राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने महाआघाडीही पेचात आहे. राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रसमध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने फुटीचे वातावरण निर्माण झाले आहे. आम्ही महाआघाडीतून उमेदवारी घेतली असली तरी आमदार मुश्रीफ यांचे आम्हाला वावडे नाही, अशी भूमिकाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांतून केली जात आहे. त्यामुळे आम्ही पक्षातून बाजूला गेलो असे नव्हे, असेही सांगितले जाते.काँगे्रसमध्येही तीच अवस्था आहे. पी. एन. पाटील यांना मानणारा रवींद्र आपटे यांचा गट आहे, तर आमदार सतेज पाटील यांना मानणारा गट आजरा तालुक्यात आहे. काँगे्रस नेमकी कुणाची पी. एन, सतेज पाटील की महादेवराव महाडिक यांची अशी अवस्था ही काँगे्रसच्या गोटातील कार्यकर्त्यांची झाली आहे. महाआघाडीचे उमेदवार ठरले असले तरी काँगे्रस-राष्ट्रवादी उमेदवारी माघारीपर्यंत ताणले जाणार आहेत. उत्तूर-मडिलगे गटातून राष्ट्रवादीचे चंद्रकांत गोरुले, गोविंद सावंत, महादेव पाटील, शिरीष देसाई यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.जिल्हा बँकेच्या ठरावावेळी राष्ट्रवादीचे ठराव चराटी यांच्याकडे गेले होते. त्या मंडळीशी संघर्ष सुरू आहे. आमदार मुश्रीफ नेमकी कोणती भूमिका घेणार की, सोयीचे राजकारण करणार यामुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत असून, जनता दलाचे सदानंद व्हनबट्टे, भाजप सरचिटणीस श्रीपती यादव हे महाआघाडीबरोबर राहणार आहेत.