शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याबाबत संभ्रमावस्था

By admin | Updated: April 28, 2015 00:28 IST

जिल्हा परिषद शिक्षकांचा प्रश्न : वेगवेगळ्या पत्रांनी पेच

बाहुबली : शैक्षणिक वर्षाच्या शेवटी म्हणजे एप्रिल व मे महिन्यांमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया केली जाते; परंतु गेली तीन-चार वर्षे या बदल्यांच्या प्रक्रियेमध्ये प्रशासन स्तरावर गोंधळ होत आहे. याहीवर्षी तशीच अवस्था प्राथमिक शिक्षण विभागाची आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समितींना सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांच्या नियमानुसार बदल्यांचे पत्र दिले. त्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी गैरसोयीतून गेलेल्या शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्याचे पत्र पाठविले. त्यामुळे शिक्षकांसह पंचायत समितीमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेकडील प्राथमिक शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, आदी कर्मचाऱ्यांच्या बदल्या ५ मे ते २५ मेपर्यंत केल्या जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या शिक्षकांची आहे. सन २०११-१२ मध्ये तालुकाबाह्य बदल्या, अतिरिक्त शिक्षक व समायोजन प्रक्रियेमुळे बदल्यांबाबत आवश्यक ती सर्व प्रक्रिया वेळोवेळी पूर्ण करता आली नाही. त्यामुळे अनेक शिक्षक बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच दोन अधिकाऱ्यांच्या पत्रांनी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.नियमानुसार गैरसोय झालेल्या शिक्षकांच्या बदल्या सर्वप्रथम करणे अपेक्षित आहे. त्यानंतर सर्वसाधारण बदल्या होणे गरजेचे आहे. यामध्ये दहा टक्के प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्या अंतर्भूत आहेत; परंतु प्रशासनाने सर्वप्रथम सर्वसाधारण बदल्या व नंतर गैरसोयीने झालेल्या बदल्यांबाबत पंचायत समितींना पत्रे पाठविली आहेत. त्यानुसार माहितीचे संकलनदेखील करून झाले आहे. आता पहिल्यांदा कोणत्या बदल्या होणार याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. (वार्ताहर)राज्य शासनाच्या आॅगस्ट २०१४च्या आदेशानुसार सर्वप्रथम गैरसोयीतून झालेल्या बदल्यांच्या प्रशासकीय बदल्या केल्या जातील. शिवाय सर्वसाधारण बदल्यांबाबतदेखील योग्य ती कार्यवाही नियमित वेळेत करून बदल्या केल्या जातील.- स्मिता गौड,प्राथमिक शिक्षणाधिकारी,जिल्हा परिषद, कोल्हापूर.