शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

इयत्ता पाचवी, आठवीच्या प्रवेशाबाबत संभ्रमावस्था

By admin | Updated: May 14, 2015 00:30 IST

पालकांना आर्थिक भुर्दंड : दोन वेगवेगळ्या परिपत्रकांमुळे पालक, संस्थाचालक, मुख्याध्यापकांचा गोंधळ

अतुल आंबी - इचलकरंजी -येथील शिक्षण मंडळ व प्राथमिक शाळांत पाचवी व आठवीचे वर्ग सुरू करण्यावरून निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेमुळे पालक, शाळांचे संस्थाचालक व मुख्याध्यापक यांचा चांगलाच गोंधळ उडाला आहे. या गोंधळामुळे पाचवी व आठवीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मात्र चांगलाच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.राज्य शासनाने प्राथमिक शिक्षण आठवीपर्यंतचे करून ज्याठिकाणी पहिली ते चौथी प्राथमिक शाळा आहे, तेथे नैसर्गिक वाढ म्हणून पाचवी व ज्याठिकाणी सातवीपर्यंतची प्राथमिक शाळा आहे, तेथे आठवीपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले. मात्र, यामध्ये पहिली ते चौथीसाठी एक किलोमीटर परिसरात, दुसरी पाचवीची शाळा असू नये, तसेच सातवीपर्यंतच्या शाळांना तीन किलोमीटर अंतरात आठवीची शाळा असू नये, अशी अटही घातली आहे. या अटीमुळे शहरातील ८५ टक्के शाळा या नियमबाह्य ठरतात. मात्र, १५ दिवसांपूर्वी येथील शिक्षण मंडळाच्यावतीने परिपत्रक काढून शहरातील सर्व प्राथमिक शाळांना पाचवी व आठवी वाढविण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करून शिक्षण मंडळ कार्यालयात देण्यासंदर्भात सूचना दिल्या. त्यानुसार मुख्याध्यापक व संस्थाचालकांनी धावपळ करून कागदपत्रांची जुळवाजुळव करून प्रस्ताव सादर केले.प्रस्ताव सादर केल्यामुळे आता पाचवी व आठवीचे वर्ग आपल्याच शाळेत सुरू होणार, असे वाटून चौथी व सातवी पास झालेल्या विद्यार्थ्यांचे दाखले संस्थेने ठेवून घेतले. काही शाळांमध्ये शिक्षण मंडळाकडून प्राप्त झालेले परिपत्रक नोटीस बोर्डावर लावून पुढील वर्ग सुरू करत असल्याची माहितीही लावण्यात आली होती. मात्र, ८ मे रोजी निकालादिवशी दुपारी बारानंतर शिक्षण मंडळाचे दुसरे परिपत्रक आले. त्यामध्ये पुढील शासन निर्णय येईपर्यंत वर्ग सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करू नये, असे कळविण्यात आले. निकाल वाटून झाल्यानंतर असे परिपत्रक हातात मिळाल्याने मुख्याध्यापक व संस्थाचालकांची भंबेरी उडाली. काही शाळांमध्ये तातडीची बैठक घेऊन याबाबत शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली. अधिकाऱ्यांनी वरिष्ठांसोबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले. मात्र, पुढील वर्ग सुरू करण्यासंदर्भात कोणता निर्णय घ्यावा, याबाबत संभ्रमावस्था मात्र कायम राहिली.आमच्याकडून कोणताही आदेश नाही : स्मिता गौडयासंदर्भात जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी स्मिता गौड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, आमच्या कार्यालयाकडून कोणत्याही शाळेला नियमबाह्य पाचवी अथवा आठवीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात सूचना अथवा प्रस्तावाची मागणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित शाळांनी पालकांना दाखले द्यावेत. तर पाचवी व आठवीचे प्रवेश स्वीकारणाऱ्या शाळांनी रीतसर नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, असे म्हटले आहे.सात हजारांपासून सुरुवात?पाचवी व आठवीमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्रतेनुसार यादीत नाव आल्यास सात हजार रुपयांपासून डोनेशन मागणीची सुरुवात केली जाते. यादीमध्ये नाव न आलेल्यांकडून दुप्पट, तिप्पट डोनेशनची मागणी केली जात आहे. अचानकपणे उडालेल्या गोंधळामुळे पालकांनाही नेमकी तक्रार करायची कुणाकडे? असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.