शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

टर्न ओव्हर टॅक्स प्रस्तावाला विरोध

By admin | Updated: November 5, 2014 00:48 IST

‘फाम’चा ठराव : मुख्यमंत्र्यांना आज भेटणार

कोल्हापूर : महापालिकेच्या कार्यक्षेत्रात स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटीऐवजी टर्न ओव्हर टॅक्स ही नवीन करपद्धती आणण्याची चाचपणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली आहे. त्याला विरोधाच्या ठरावासह अन्य महत्त्वपूर्ण ठरावही फेडरेशन असोसिएशन आॅफ महाराष्ट्र (फाम)च्या मुंबई येथील बैठकीत करण्यात आले. ठरावाची माहिती देण्यासाठी उद्या (बुधवारी) मुख्यमंत्र्यांची शिष्टमंडळ भेट घेणार असून शासनाकडूनच पर्याय आल्यावर पुढील चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.महापालिकेच्या कार्यक्षेत्रात स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटीऐवजी टर्नओव्हर टॅक्स ही नवीन करपद्धती आणण्याची चाचपणी नूतन मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर फेडरेशन असोसिएशन आॅफ महाराष्ट्र (फाम)ने या संदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज मुंबईत बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी ‘फाम’चे अध्यक्ष मोहन गुरूनानी होते.दुपारी दोनपासून सायंकाळी पाचपर्यंत झालेल्या या बैठकीत महापालिकेकडून सध्या सुरू असलेली ‘एलबीटी’ विरोधातील कारवाई स्थगित करावी. टर्न ओव्हर टॅक्सचा प्रस्ताव मागे घ्यावा. त्याचबरोबर ‘एलबीटी’ विरोधात केलेल्या आंदोलनातील आंदोलकांवर दाखल खटले मागे घ्याव्यात, असे महत्त्वपूर्ण तीन ठराव करण्यात आले. याबाबतची माहिती उद्या (बुधवारी) मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात येणार आहे. त्यानंतर शासनाकडून ‘एलबीटी’बाबत कोणते पर्याय दिले जातात. त्यावर पुन्हा बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.यावेळी नागपूर विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल, पुणे मर्चंट चेंबरचे अध्यक्ष वालचंद संचेती, पुणे, मिरज, कुपवाड परिसर ‘एलबीटी’विरोधी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष विराज कोकणे, समितीचे सदस्य समीर शहा, कोल्हापूर जिल्हा व्यापारी व उद्योजक महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगांवकर, अमर क्षीरसागर, अमोल नष्टे, घन:श्याम पटेल यांच्यासह राज्यातील २६ महापालिका क्षेत्रांतील व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)