शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

विरोधच ! ग्रामसभा ठराव करणार

By admin | Updated: June 28, 2015 00:52 IST

जिल्हाधिकाऱ्यांना उद्या भेटणार : विरोधी कृती समितीचा बैठकीत निर्णय

कोल्हापूर : जिल्हाधिकारी शासनाला हद्दवाढीसंदर्भात अहवाल पाठविणार आहेत. त्यामध्ये प्रस्तावित केलेल्या गावांचा विरोध असून, त्या स्वरूपाची माहिती त्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी उद्या, सोमवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकाऱ्यांना सर्व ग्रामसभांचे ठराव देण्याचा निर्णय शनिवारी येथे घेण्यात आला. हद्दवाढविरोधातील दिशा ठरविण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे हद्दवाढविरोधी कृती समितीचे अध्यक्ष माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार सुजित मिणचेकर, जिल्हा परिषदेचे सदस्य एस. आर. पाटील, समितीचे निमंत्रक नाथाजीराव पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती. संपतराव पवार-पाटील म्हणाले, हद्दवाढीविरोधात शिस्तबद्ध रीतीने आंदोलन केले जाईल. कुणावरील आकसापोटी हे आंदोलन नाही. यापूर्वी हद्दवाढीसाठी महापालिकेने सरकारकडे पाठविलेल्या माहितीमध्ये या गावांमधील जमिनी नापीक असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे आपल्याला गावातील पिकाऊ जमीन, पशुधन यासह भौगोलिक परिस्थिती, आदी इत्थंभूत माहिती सरकारला कळवावी लागणार आहे. त्या दृष्टीने प्रत्येकाने ही माहिती संकलित करावी. आमदार नरके म्हणाले, हद्दवाढीसंदर्भात जिल्हाधिकारी लवकरच सरकारला अहवाल पाठविणार आहेत. त्यामध्ये गावांचा विरोध असल्याचे नमूद व्हावे, यासाठी हद्दवाढीतील प्रस्तावित सर्व गावांचे हद्दवाढीला विरोध असणारे ग्रामसभांचे ठराव, त्याचबरोबर जिल्हा परिषद, करवीर व हातकणंगले पंचायत समित्यांचे ठराव घेऊन ते उद्या, सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना देऊया. आमदार मिणचेकर म्हणाले, आम्ही हद्दवाढीविरोधात असून यासाठी नेहमीच लढा देत आलो आहे. जनरेट्याशिवाय आंदोलनाला ताकद येत नाही. हातकणंगले तालुका हद्दवाढविरोधात समितीच्या पाठीशी ठाम आहे. हद्दवाढविरोधात शेवटपर्यंत लढा देऊ. नाथाजीराव पोवार म्हणाले, शासन व न्यायालय हे कागदावरच बोलतेय. त्यामुळे हद्दवाढविरोधात आपण आता त्याच पद्धतीने वाटचाल केली पाहिजे. ग्रामसभांचे ठराव, सातबारा, शेती, आदी माहिती संकलित करून ती दिली पाहिजे. त्यामुळे लढ्याला बळ येईल. प्रा. बी. जी. मांगले म्हणाले, आपण महापालिकेच्या हद्दीत राहत असलो तरी हद्दवाढीच्या विरोधात आहोत. कारण ते आम्हाला सुविधा देऊ शकत नाहीत, तर तुम्हाला काय देणार? हद्दवाढविरोधासाठी संघटित व्यासपीठ असेल तर लढाईला जोर येतो. एस. आर. पाटील यांनी सर्वच पातळ्यांवर व सर्व तयारीशी हद्दवाढीविरोधात समितीसोबत असल्याचे सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई, राजू माने, बी. ए. पाटील, नारायण पोवार, सुरेशराव सूर्यवंशी, नंदकुमार गोंधळी, रावसाहेब दिगंबरे, सचिन चौगले, आप्पासाहेब धनवडे, प्रकाश टोपकर, दिलीप पाटील, मधुकर जांभळे, उदय जाधव यांच्यासह वीस गावांतील प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)