शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपूर पालिकेसाठी व्यूहरचना

By admin | Updated: October 12, 2015 00:30 IST

सत्ताधाऱ्यांकडून चाचपणी : आगामी निवडणुकीचे वेध; विरोधात कोण लढणार? आतापासूनच चर्चा --नगरपालिका वार्तापत्र

संदीप बावचे -- जयसिंगपूर-मतदार नोंदणी कार्यक्रमाने जयसिंगपूर सार्वत्रिक निवडणुकीचा श्रीगणेशा झाला आहे. २०१६ मध्ये निवडणुका गृहीत धरून सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीकडून आतापासूनच व्यूहरचना आखली जात असल्याचे चित्र आहे, तर विरोधी आघाडीत कोण असणार, स्वाभिमानीची भूमिका व शिवसेना, भाजप, शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडी कोणता निर्णय घेणार, या चर्चेला जोर आहे. गत निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत राजर्षी शाहू विकास आघाडीची एकहाती सत्ता नगरपालिका निवडणुकीत आली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनसुराज्य शक्ती, शिवसेना व भाजपने मोट बांधून निवडणूक लढली होती. मात्र, निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचा एक उमेदवार निवडून आला होता. या निवडणुकीतील पराभवानंतर खासदार राजू शेट्टी यांनी पुन्हा निवडणूक न लढण्याचे भाष्य केले होते. मतदार नोंदणी कार्यक्रमाने जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीचा श्रीगणेशा झाला आहे. एकसदस्यीय प्रभाग रचना होणार असल्याने अनेक इच्छुकांकडून आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधले जात आहे. सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीकडूनही व्यूहरचना आखली जात आहे. नगरपालिकेची निवडणूक गृहीत धरून स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, भाजप यांची भूमिका काय असणार, हा मुद्दा असला तरी केडीसीसी निवडणुकीत स्वाभिमानीने यड्रावकर गटाला मदत केली आहे. नगरपालिका निवडणुकीत ही मदत पुन्हा राहणार का? असाही प्रश्न आहे. शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी मध्यंतरी नगरपालिकेत बैठक घेऊन शहरातील प्रलंबित प्रश्नांवर नेम साधण्याचा प्रयत्न केला होता. आमादर पाटील शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून नगरपालिका निवडणुकीचे शिवधनुष्य उचलण्याची शक्यताही नाकारता येत नाही. केडीसीसी व गोकुळमधील निवडणुकीचे उट्टे काढण्यासाठी बहुजन विकास आघाडी जयसिंगपूर पालिका निवडणुकीत उतरणार असेच चित्र आहे. केंद्रात व राज्यात सत्तेत असणारे भाजप जयसिंगपूर पालिकेत स्वतंत्र निवडणूक लढविणार का? हाही मुद्दा उपस्थित होत आहे. कोल्हापूर महापालिकेप्रमाणे कॉँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष पक्षीय चिन्हावर निवडणुका लढतील, असे सध्या तरी चित्र दिसत नाही. माजी आमदार डॉ. सा. रे. पाटील यांच्या निधनानंतर कॉँग्रेस पक्षात शिथिलता आली असली, तरी त्यांचे पुत्र व दत्त कारखान्याचे अध्यक्ष उद्यानपंडित गणपतराव पाटील यांची नगरपालिका निवडणुकीत भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.सध्यातरी विकासकामांतून विरोधकांना प्रत्युत्तर देण्याची तयारी सत्ताधारी गटाकडून सुरू आहे. आतापासूनच राजकीय तर्कवितर्कांना ऊत आला असला, तरी जयसिंगपूर नगरपालिकेची आगामी निवडणूक विविध कारणांनी गाजणार, हे मात्र निश्चित.राजकीय सत्ता : समीकरणे बदललीविधानसभा निवडणुकीत बदलेली राजकीय समीकरणे, गोकुळ दूध संघ व केडीसीसी बॅँकेच्या निवडणुकीतील घडामोडींमुळे तालुक्यातील राजकारणात मोठा बदल झाला आहे. विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्र लढल्यामुळे तालुक्यातील राजकारणाला वेगळी दिशा मिळाली होती. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही हा राजकीय रंग मोठ्या प्रमाणात दिसून आला.