शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

संक्रांत, पतंगाचे नाते आजही घट्ट, पतंग खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 13:28 IST

संक्रांत आणि तिळगुळाचे नाते जितके घट्ट आहे तितकेच घट्ट नाते संक्रांत आणि पतंगाचे आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजणाला पतंगाबाबत आकर्षण असते. पतंग खरेदीसाठी बाजारपेठा फुललेल्या दिसत आहेत; तर सायंकाळी शहरातील मोकळ्या मैदानावर तसेच इमारतींच्या गच्चीवर पतंग उडविण्यासाठी गर्दी झाली होती.

ठळक मुद्देसंक्रांत, पतंगाचे नाते आजही घट्टपतंग खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

कोल्हापूर : संक्रांत आणि तिळगुळाचे नाते जितके घट्ट आहे तितकेच घट्ट नाते संक्रांत आणि पतंगाचे आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजणाला पतंगाबाबत आकर्षण असते. पतंग खरेदीसाठी बाजारपेठा फुललेल्या दिसत आहेत; तर सायंकाळी शहरातील मोकळ्या मैदानावर तसेच इमारतींच्या गच्चीवर पतंग उडविण्यासाठी गर्दी झाली होती.संक्रांतीच्या आदल्या दिवशी अनेकांनी पतंग घेतले. गल्लीतील, कॉलनीतील मुलांनी पतंग आणलेला पाहून अनेक मुलांनी आई-बाबांकडे हट्ट करून पतंग खरेदी केली. विशेष करून रंगीबेरंगी पतंग खरेदी न करता पबजी, स्पायडरमॅन, छोटा भीम, डोरेमॉन, अँग्री बर्ड, सुपरमॅन या पतंगांची लहान मुलांकडून मागणी होती. लाकडी फिरक्यांसह मुलांसाठी लहान प्लास्टिकच्या फिरक्याही खरेदी केल्या. बाजारात नायलॉनच्या मांजासह प्लास्टिकबंदीमुळे यंदा पॉलिथीनचे पतंगही दिसेनासे झाले आहेत.शाळांना सुट्टी असल्यामुळे सायंकाळी पतंग उंचच्या उंच उडविणारी मंडळी, पतंग उडविताना अधूनमधून तिळगुळाचे लाडू तोंडात टाकणे, काटलेला पतंग खाली पडताच ती पकडण्यासाठी मुलांची होणारी धावपळ हे चित्र बुधवारी ठिकठिकाणी दिसले.

पतंगाची किंमत पाच रुपयांपासून ते ७० रुपयांपर्यंत आहे. लहान मुलांकडून कार्टून, रंगीत पतंगांना विशेष मागणी आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने काही प्रमाणात पतंगांची किंमत यंदा वाढली आहे.- गणेश वडर, विक्रेते

 

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीkolhapurकोल्हापूर