शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
2
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
3
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
4
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
5
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
6
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
7
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
8
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
9
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
10
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
11
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
12
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
13
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
14
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
15
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
16
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
17
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
18
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
19
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
20
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”

अवैध बांधकामाबाबत मिलिभगत

By admin | Updated: December 21, 2014 00:10 IST

महापालिका सभा : अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

कोल्हापूर : तावडे हॉटेल परिसरातील बांधकामांना न्यायालयाचा ‘जैसे थे’ आदेश असूनही पुन्हा बांधकामे होत असताना महापालिकेचे अधिकारी कोणतीच कारवाई करीत नाहीत, न्यायालयात आपले वकील हजर राहत नाहीत. या अवैध बांधकामांना अधिकाऱ्यांचा पाठिंबा असून, त्यांच्याशी मिलिभगत असल्याचा थेट आरोप आज, शनिवारी झालेल्या महानगरपालिका सर्वसाधारण सभेत करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी उच्च न्यायालयात काम पाहणाऱ्या पालिकेच्या वकिलांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर तृप्ती माळवी होत्या. विरोधी पक्षनेते मुरलीधर जाधव यांनी तावडे हॉटेल परिसरातील अवैध बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला. न्यायालयाने ‘जैसे थे’चा आदेश दिला असतानाही पुन्हा बांधकामे करण्यात आली आहेत. याप्रकरणी प्रशासनाने काय कारवाई केली, याची माहिती जाधव यांनी विचारली. तेव्हा उपनगर अभियंता एम. एम. निर्मळे यांनी संबंधितांना नोटीस पाठविली असून, न्यायालयाच्या निदर्शनास ही गोष्ट आणून देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले; परंतु जाधव यांच्यासह आदिल फरास, निशिकांत मेथे यांनी निर्मळे यांना धारेवर धरत अशी छापील उत्तरे किती दिवस देणार आहात, असा जाब विचारला. अधिकारी नगरसेवकांच्या तोंडाला पाने पुसत असल्याचा आरोपही मेथे यांनी केला. आदिल फरास यांनी मिळकतधारक व महापालिका अधिकारी यांची मिलिभगत असल्याचा थेट आरोप केला. न्यायालयाने आदेश देऊनही जर बांधकाम होत असेल तर तातडीने न्यायालयात जाऊन अवमान याचिका दाखल करणे आवश्यक होते. यासंबंधीच्या न्यायालयीन कामकाजास आपले वकील जाणीवपूर्वक गैरहजर राहतात, असाही आक्षेप त्यांनी नोंदविला. वकिलांच्या गैरहजर राहण्यावरही शंका येऊ लागली असून, ते का गैरहजर राहतात याची चौकशी करावी, अशी मागणी फरास यांनी केली. प्रभारी आयुक्त नितीन देसाई यांनी ज्यांनी बांधकामे केली आहेत त्यांचे फोटो घेतले असून, १४ जानेवारी रोजी होणाऱ्या कामकाजावेळी ते न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतरच या विषयावर पडदा पडला. लेआउटचे पैसे भागात खर्च करणार लेआउटला मंजुरी देताना भरून घेण्यात आलेली रक्कम ज्या त्या भागात खर्च करावी, असा निर्णय सभेत घेण्यात आला; तर मधुकर रामाणे यांनी लेआउट मंजूर करतेवेळी पैसेच भरून घेत नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. पैसे भरून घेण्यापेक्षा पायाभूत सुविधाच त्या बिल्डरकडून करून घ्याव्यात, अशी सूचना आर. डी. पाटील यांनी केली. लेआउटच्या रकमेतील किमान पन्नास टक्के रक्कम ही अंतिम लेआउटमधील इमारतीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर खर्च करावी, अशी सूचना शारंगधर देशमुख यांनी केली. (प्रतिनिधी)