शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

संगणक सेवक मानधनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: March 17, 2016 23:44 IST

संग्राम योजना बंद : बेकारीची कुऱ्हाड, ग्रामपंचायतींमधील संगणक सेवा कोलमडली

राहुल मांगुरकर --अर्जुनवाड --कॉँग्रेस सरकारच्या काळात सुरू झालेली संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) ही योजना ३१ डिसेंबरपासून भाजप सरकारने बंद केली आहे. राज्यात २७ हजार संगणक सेवक म्हणून संग्राम योजनेअंतर्गत कार्य करीत होते. त्यांच्यावर जानेवारी २०१६ पासून बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. तसेच आॅक्टोंबर ते डिसेंबर २०१५ या कालावधीतील मानधन न मिळाल्याने आर्थिक आरिष्टात संगणक सेवक सापडला आहे.कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सन २०११ साली शासनाने राज्यातील ग्रामपंचायती बळकटीकरण करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीस संगणक, स्कॅनर, प्रिंटर, इंटरनेट सुविधा दिल्या होत्या. तसेच संगणक परिचालक नेमून ई-गव्हर्नस बरोबर रोजगाराला चालना दिली होती. यामुळे ग्रामपंचायतीला चांगल्या प्रकारे बळकटीकरण येऊन प्रत्येक गावाची माहिती वेबसाईटद्वारे अद्ययावत करण्याबरोबर सर्वत्र एकसारखे संगणकीयकृत दाखले, जमा खर्च, योजना, आदी कामकाज संगणकाद्वारे चालत होते. जन्म, मृत्यू, घरांची मालमत्ता नोंदणी, आदी कामकाज चालत होते. या योजनेसाठी १३ वा वित्त निधी उपयोगी ठरला होता.मात्र, १३ वा वित्त आयोगाचा हा निधी काही दिवसांपूर्वी संपला, तर काही ग्रामपंचायतीकडे निधी शिल्लक असल्याने त्यांना वारंवार मुदत वाढ देण्यात आली होती. त्यानंतर १४ व्या वित्त आयोगाची स्थापना केली. मात्र, यामध्ये संग्राम योजनेकडे राज्य शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. भाजप सरकारने १४ व्या आयोगाची रक्कम थेट ग्रामपंचायतीला देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये संग्राम योजनेला थारा दिला नसल्याने घरघर लागली आहे. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमधील संगणक संच धुळखात पडून असून, इंटरनेट बिलही विनाकारण भरावे लागत आहे. संगणक परिचालकावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. आॅक्टोबर ते डिसेंबरचे मानधन थकीतया योजनेत काम केलेल्या संगणक परिचालकांचे माहे आॅक्टोबर १५ ते डिसेंबर १५ चे मानधन आजही थकीत आहे. यासाठी संघटना व परिचालकांनी शासनाकडे मागणी करूनही या योजनेकडे दुर्लक्ष करण्याबरोबरच त्यांच्या थकित मानधनाकडे पाठ फिरविली. तसेच संगणक परिचालकांनी महाआॅनलाईन कंपनीशी संपर्क साधण्याची सूचना कार्यासन अधिकारी अर्चना वालझाडे यांनी दिली. संगणक सेवक आर्थिक आरिष्टातमहाआॅनलाईन कंपनी, टाटा कन्सल्टन्सी व शासनाच्या या गोंधळात संगणक सेवक आर्थिक आरिष्टात सापडला आहे. हाताला काम नाही, मागचे थकीत मानधन मिळत नाही. येथून पुढे काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर ‘आ’ वासून उभा आहे.